News Flash

मोतीबिंदूपासून ते पित्ताच्या त्रासापर्यंत! ‘हे’ आहेत सफरचंदाच्या सालीचे फायदे

सफरचंदाच्या सालीचे गुणकारी फायदे

आपल्या आहारात पालेभाज्यांपासून ते विविध फळांपर्यंत प्रत्येक पदार्थाचा समावेश असला पाहिजे. मात्र अनेक वेळा लहान मुले किंवा मोठी माणसेदेखील फळं खाण्यास कंटाळा करतात. परंतु, फळं ही शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. त्यांच्या सेवनामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे आपल्या आहारात फळांचा आवर्जुन समावेश करायला हवा. विशेष म्हणजे यात सफरचंद हे अत्यंत गुणकारी फळ असल्याचं म्हटलं जातं. इतकंच नाही तर सफरचंदाचं सालदेखील शरिरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे सफरचंदाच्या सालीचे उपयोग कोणते ते जाणून घेऊयात.

१. मोतीबिंदूपासून बचाव होण्यासाठी सफरचंद सालांसकट खाण्याने मदत होते. तसेच नियमितपणे सफरचंद खाल्ल्यास मोतीबिंदू होत नाही.

२. सफरचंद हे दातांना किडण्यापासून बचाव करते. याशिवाय गर्भवती महिलांमध्ये रक्तवाढीसाठी सफरचंद उपयुक्त ठरते. त्यामुळे सफरचंदाचा आहारातील समावेश तोही सालांसकट अतिशय महत्त्वाचा असतो.

३. सफरचंदाची साले रक्तातील सारखेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे ज्यांना मधुमेह असेल त्यांनी सफरचंद सालासकट खाणे गरजेचे आहे.

४. सफरचंदात जास्त प्रमाणात फायबर असल्याने पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी ते अतिशय उपयुक्त आहे. यामुळे शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठीही मदत होते.

५. सफरचंदाच्या सालांमुळे मेंदूतील पेशी लवकर खराब होत नाहीत. तसेच यामुळे बुद्धी चलाख होण्यास मदत होते. त्यामुळे सालीसकट खाल्लेले सफरचंद फायद्याचे असते.

६. किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांच्यासाठीही सफरचंद खाणे फायदेशीर असते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 4:30 pm

Web Title: peel of apple is useful for health keep it in your diet ssj 93
Next Stories
1 पांढऱ्या केसांनी त्रस्त आहात? मग घ्या ‘ही’ काळजी
2 तब्बल 7000mAh बॅटरी + 64MP कॅमेरा, Samsung Galaxy M51 भारतात लाँच; जाणून घ्या डिटेल्स
3 विनर विनर चिकन डिनर : PUBG चाहत्यांनी काढली गेमची अंत्ययात्रा ; व्हिडिओ झाला व्हायरल
Just Now!
X