News Flash

Iphone असेंबल करणारी ‘ही’ कंपनी भारतात सुरू करणार प्रकल्प

यापूर्वी फॉक्सकॉनंही भारतात गुंतवणूक करण्यात दाखवला होता रस

(File Photo - AP)

करोनाच्या संकटादरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये भारतात तब्बल २० अब्ज डॉलर्सची टेक गुंतवणूक झाली आहे. ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार अॅपलची असेंबल पार्टनपर Pegatron Corps भारतात मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. कंपनी भारतातील आपला पहिला असेंबलिंग प्रकल्प सुरू करण्याच्या विचारात आहे. सध्या या कंपनीचे चीनमध्ये अनेक असेंबलिंग प्रकल्प आहेत. परंतु अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान अनेक कंपन्या दबावामुळे आपल्या भविष्यासाठी अधिक सतर्क आहेत.

परदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारनं जून महिन्यात ६.६ अब्ज डॉलर्सची विशेष योजना तयार केली होती. त्या अंतर्गत स्मार्टफोनचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना फायनॅन्शिअल इंसेटिव्ह्स देऊन भारतात गुंतवणुकीसाठी आकर्षित केलं जात आहे. Pegatron Corps आयफोनची दुसरी सर्वात मोठी असेंबलर आहे. या कंपनीचा अर्धा व्यवसाय हा अॅपलकडूनच मिळतो. यासाठी कंपनीनं चीनमध्ये अनेक प्रकल्प सुरू केले आहेत.

फॉक्सकॉनही प्रकल्प सुरू करण्याच्या विचारात

आयफोनची निर्मिती करणारी प्रसिद्ध अ‍ॅपल कंपनी हळूहळू चीनमधून आपले उत्पादन प्रकल्प दुसऱ्या देशांमध्ये नेत आहे. अ‍ॅपलशी संबंधित असलेली फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी भारतात व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली होती. चेन्नईजवळ श्री पेरुंबुदूर येथे कारखान्याचा विस्तार करण्याचा फॉक्सकॉनचा विचार आहे. भारतात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना असून फॉक्सकॉन अ‍ॅपल कंपनीसाठी आयफोन असेंबल करण्याचे काम करते.

फॉक्सकॉन Apple आणि शाओमीसाठी आधीपासूनच भारतात स्मार्टफोन बनवते, पण करोना व्हायरस महामारीमुळे कंपनीने उत्पादन स्थगित केले आहे. “करोना व्हायरसमुळे सध्या काही विशिष्ट परिणाम झाले असले तरीही भारत विकासासाठी एक उत्तम स्थान आहे,” असे फॉक्सकॉनचे अध्यक्ष लियू यंग-वे (Liu Young-way) हे फॉक्सकॉनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हणाले होते. “आम्ही भारतात पुढील गुंतवणूकीच्या तयारीत आहोत, येत्या काही महिन्यांमध्ये आमच्या वेबसाइटवर पुढील योजनांबाबत माहिती दिली जाईल”, असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 7:01 pm

Web Title: pegatron corps apple iphone assemble company planning to start new plant in india jud 87
Next Stories
1 पाच कॅमेऱ्यांच्या Realme 6 साठी भारतात अजून एक व्हेरिअंट लाँच, किंमत…
2 नवीन Poco M2 Pro चा ‘या’ तारखेला Flash Sale, किंमत 15 हजारांपेक्षा कमी
3 GoAir ने प्रवाशांसाठी आणलं ‘क्वारंटाइन पॅकेज’; 1,400 रुपयांपासून सुरूवात
Just Now!
X