एका २५ वर्षांच्या युवकावर दुर्मिळ ‘पेल्विक बोन’ शस्त्रक्रिया  करण्यात आली असून अशाप्रकारची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचा दावा कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलकडून करण्यात आला आहे. रणजित यादव हा २५ वर्षांचा युवक गेले काही दिवस अतिशय आजारी होता. त्याच्या पेल्विक हाडांमध्ये ट्युमर आढळून आला होता आणि तो काढण्यासाठी एक पाय कायमचा गमवावा लागेल की काय अशी भीती निर्माण झाली होती. रणजितला असेही सांगितले गेले की या सर्जरीमध्ये पेल्विक हाड काढावे लागेल आणि त्याला जवळपास ६-७ महिने अंथरुणातच काढावे लागतील. त्यानंतरही त्याचा एक पाय दुसऱ्या पायांपेक्षा ५ ते ७ सेंटीमीटरने कमी असेल. अँप्युटेशन आणि त्यासोबत केमोथेरपी किंवा इंटर्नल हेमीपेलवेक्टॉमीसोबत ट्युमर काढून टाकणे हे दोन उपचार पर्याय त्याला सुचविण्यात आले. दुसरा पर्याय स्वीकारल्यास ६ महिने अंथरुणात राहावे लागेल आणि पुढील संपूर्ण आयुष्यभर एक पाय तोकडा राहील अशी धास्तीही होतीच.

हाडांचे कर्करोग तसे दुर्मिळ असतात. पेल्विक बोन म्हणजेच हिप जॉईंट, शरीराला आधार देणारे मुख्य हाड, ज्याच्या आजूबाजूला अनेक महत्त्वाची हाडे, अवयव असतात आणि त्यामध्ये ट्युमर निर्माण झाल्यास पायाला अजिबात इजा न होऊ देता तो काढून टाकणे हे कॅन्सर सर्जन्ससमोरील खूप मोठे आव्हान असते. काहीही करून आपला पाय वाचावा यासाठी एक शेवटचा प्रयत्न म्हणून तीन महिन्यांपूर्वी रणजित यादव ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजीच्या बाह्यरुग्ण विभागात आला. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रणजितसाठी उपयोगी पडतील अशा विविध पर्यायांचा अभ्यास केला. अशा परिस्थितीमध्ये एक सर्जिकल पर्याय असा सापडला की ज्यामुळे रुग्णाचा पाय वाचविता येऊ शकतो. त्यासाठी कर्करोगग्रस्त पेल्विक हाड काढून त्याजागी एलॊजेनिक ग्राफ्ट लावावे लागते. हे ग्राफ्ट ताजे गोठवलेले असणे आवश्यक असते. पण, भारतात दाता मिळत नसल्यामुळे ताजे गोठवलेले ग्राफ्ट उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे यामध्ये ग्राफ्ट फ्रॅक्चर होण्याचा देखील धोका संभवतो. पाय वाचविण्यासाठी नवीन सर्जिकल पर्यायांवर विचार करण्यात आला.

plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
maharashtra sugar production, 108 lakh ton sugar production
यंदा मुबलक साखर; आतापर्यंत झाले ‘एवढे’ उत्पादन

पेल्विक हाड काढून त्याजागी पेल्व्हिसचे थ्रीडी रिकन्स्ट्रक्टेड मेटल प्रोस्थेसिस बसविणे, सोबत हिप जॉईंट बदलणे, सर्जरीच्या आधी व नंतर केमोथेरपी हे उपचार करण्याचे ठरले. रुग्णाच्या शरीराच्या आकारमानानुसार बनविण्यात आलेले पेल्विक प्रोस्थेसिस हाडाच्या समस्याग्रस्त भागात बरोबर बसू शकते आणि पेल्व्हिसला त्याच्या मूळ रूपात रिकन्स्ट्रक्ट करू शकते. रुग्णाच्या शरीरानुसार ऑस्टिओटॉमी गाईड असल्यामुळे ऑस्टिओटॉमी ऍक्यूरसी लक्षणीय प्रमाणात सुधारते. या रुग्णाचे एक्सरे आणि एमआरआय पाहून तपशीलवार चर्चेनंतर डॉ. रोहेला आणि त्यांच्या टीमने या केसमध्ये थ्रीडी ई-प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून नाविन्यपूर्ण सर्जिकल उपचार करण्याचे ठरविले. इम्प्लान्टची रचना करण्यासाठी थ्रीडी ई-प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. हाडातील ट्युमर यशस्वीरीत्या काढून त्याजागी कस्टम मेड प्रोस्थेसिसचे एक्सईज्ड पेल्विक बोन बसविण्यात आले. या यशस्वी सर्जरीनंतर हा तरुण युवक अवघ्या काही दिवसातच नीट चालू लागला. याबाबत बोलताना, डॉ. हिमांशू रोहेला (ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजिस्ट)  यांनी सांगितले, “भारताबाहेर करण्यात आलेल्या संशोधन व अभ्यासातून असे आढळून आले आहे की, असे उपचार यशस्वी होण्याचे प्रमाण खूप चांगले आहे. या नाविन्यपूर्ण सर्जिकल उपचारांमध्ये नैपुण्य अतिशय आवश्यक आहे. आमच्या माहितीप्रमाणे भारतातील इतर कोणत्याही टर्शरी कॅन्सर सेंटर्समध्ये हाडाच्या कर्करोगाच्या रुग्णांवर असे खास उपचार केले जात नाहीत.”  आज रणजित यादव आपल्या नवीन हाडाच्या मदतीने, कर्करोगाची अजिबात भीती न बाळगता चालू शकतोय याचा आम्हाला अतिशय आनंद असल्याचंही डॉक्टर म्हणाले.