प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या लोकांची स्वतःची खासियत असते आणि हे गुण त्यांच्या आयुष्यात, आचरणात आणि वागण्यातही दिसून येतात. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांबद्दल बोलायचे झाल्यास, वर्षाच्या नवव्या महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये अंकशास्त्रानुसार असे अनेक गुण असतात, जे त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात. अंकशास्त्रात सप्टेंबर हा मंगळ ग्रहाशी संबंधित मानला जातो. हा ग्रह धैर्य आणि पराक्रमाचा घटक मानला जातो. यामुळे, या महिन्यात जन्मलेले लोक खूप धैर्यवान, स्पष्टवक्ते असतात आणि स्वतःच त्यांचा ठसा उमटवतात.

असतात परफेक्‍शनिस्‍ट

सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक बुद्धिमान, दयाळू आणि परफेक्‍शनिस्‍ट असतात असे म्हंटले जाते. या लोकांमध्ये व्यावहारिक तसेच भावनिक असण्याचा एक अद्भुत संतुलन असते. हे लोक जे करायचे ठरवतात ते पूर्ण करूनच राहतात. ते अतिशय रोमँटिक स्वभावाचे असतात.

pragya singh thakur
Malegaon Blast Case : “२५ एप्रिलला हजर रहा, अन्यथा..”, न्यायालयाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांना काय सांगितलं?
indian man killed in canada
कॅनडामध्ये भारतीय तरुणाची हत्या? कारमध्ये आढळला मृतदेह, पोलीस म्हणाले…
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…

(हे ही वाचा – ‘या’ राशीच्या मुली नेहमी आनंदी आणि मन जिंकणाऱ्या असतात, जोडीदारासाठी भाग्यवानही ठरतात)

करिअरमध्ये लवकर मिळते यश

या महिन्यात जन्मलेले लोक करिअरच्या दृष्टीने खूप भाग्यवान असतात आणि लहान वयातच मोठे यश मिळवतात. या लोकांना जीवनात चांगले स्थान मिळते. साधारणपणे सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांना संशोधन, शिक्षण, राजकारणात चांगले यश मिळते. तथापि, ते स्वतःविरुद्ध काहीही सहन करू शकत नाहीत याच मुळे ते रागात येऊन स्वतःच मोठे नुकसान करून घेतात.

वैवाहिक जीवन कसे असते?

सप्टेंबरमध्ये जन्माला आलेल्या लोकांना असा जीवन साथीदार भेटतात ज्यात त्यांच्या आवडीच्या सर्व गोष्टी असतात. यामुळे, त्यांना त्यांच्या जीवन साथीदाराशी जुळवून घेताना कोणतीही अडचण येत नाही. हे लोक सहसा आयुष्यभर आनंदी वैवाहिक जीवन जगतात.

शुभ अंक- ४,५,१६,९०,२९
शुभ रंग- तपकिरी, निळा आणि हिरवा
शुभ दिन- बुधवार
शुभ रत्‍न- पन्ना

(टीप: या लेखातील माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे.)