मुळात धोका न देणारा जीवनसाथी शोधणे महाकर्मकठीण काम. त्यात अशी काही संभाव्य क्षेत्र समोर आली आहेत ज्यातील व्यक्तींवर तुम्ही विश्वास ठेवणे कठीण ठरू शकते. नुकतीच एक पाहणी करण्यात आली ज्यात ही माहिती समोर आली आहे. या पाहणीत पाच हजार महिलांशी चर्चा करण्यात आली. यातील काही महिला त्यांच्या जोडीदाराला धोका देत असल्याचे, तर काहींनी धोका दिला आसल्याची कबूली दिली. तीन महिलांपैकी दोघींचे कार्यालयातील मित्रासोबत संबंध असल्याचे पाहाणीतून समोर आले. असे असले तरी अधिकतर महिलांनी कार्यालयातील सहकाऱ्यांसोबत जवळीक करण्यास फार महत्व देत नसल्याचे सांगितले. परंतु सहकाऱ्यांसोबतच्या जवळीकीमुळे काम विनासायास होत असल्याचेदेखील या पाहणीतून समोर आले.
सहकाऱ्यासोबतच्या जवळीकीत दुरावा निर्माण झाला असता अशा परिस्थितीतदेखील दोघांना एकत्र काम करावे लागत असल्याची खंत काही महिलांनी व्यक्त केली. ही जवळीक ऑफीसमध्ये चर्चेचा विषय झाली तर आपल्यासोबत धोका होत असल्याचे वृत्त जोडीदारापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते, अशी भीती काहींनी बोलून दाखवली. करिअरसोबत लव्ह लाइफ एक्टिव्ह ठेवल्यास त्याचे करिअरवर वाईट परिणाम होत असल्याचे केवळ दहा टक्के महिलांचे मानणे असल्याची माहिती या पाहणीत समोर आली.
व्हिक्टोरिया मिलानने केलेल्या पाहणीत ५,६५८ महिलांनी सहभाग घेतला होता. जीवनाचा अधिक आनंद लुटण्यावर लोकांचा भर असल्याचे या पाहणीतून समोर आल्याचे व्हिक्टोरिया मिलानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापकांचे मानणे आहे. आनंदी जीवनापुढे ते करिअरला जास्त महत्त्व देत नाहीत. आपल्या जोडीदाराला धोका देण्यामध्ये बँकर्स आणि ब्रोकर्सची संख्या अधिक असल्याचे या पाहणीतून समोर आले. जोडीदाराचा विश्वासघात करत असल्याचे मान्य करणाऱ्या महिलांमध्ये या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्याचे पाहणीत आढळून आले.
अर्थ आणि गुंतवणूक – बँकर्स, ब्रोकर्स, विश्लेषक
व्यवसाय – सीईओ, व्यवस्थापक, सचिव
क्रीडा – खेळाडू, प्रशिक्षक, प्रतिनिधी
कला – वादक, मॉडेल्स, अभिनेता, छायाचित्रकार
विधी – वकील, सचिव
संवाद – पत्रकार, जनसंपर्क
आरोग्य – डॉक्टर, नर्स, सहायक