पावासाळा सुरु झाला कि, वेगवेगळया ग्रुप्समध्ये पिकनिकचे प्लान्स सुरु होतात. पावसाळयात खुलून येणारे निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी डोळे आतुर झालेले असतात. डोंगररांगा, दऱ्या खोऱ्यांनी हिरवी शाल अंगावर ओढलेली असते. निसर्गाचे हे मनमोहक रुप पाहून मनाला एक प्रसन्नता मिळते. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांची पावले गड-किल्ल्यांकडे वळतात तर अन्य पर्यटनप्रेमी फॅमिली रिसॉर्टला प्राधान्य देतात.

आज आपण जाणून घेऊया मुंबई जवळ असलेल्या पाच पिकनिक स्पॉटविषयी

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
Tandlyachya pithache sandge recipe
झटपट दुप्पट फुलणारे तांदळाचे सांडगे; ‘या’ पद्धतीन बनवा कुरकुरीत सांडगे

माथेरान
महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांमध्ये माथेरानचा समावेश होते. माथेरान हे मुंबईपासून जवळ असलेले पर्यटन स्थळ आहे. माथेरानचे निसर्ग सौंदर्य, जंगल नेहमीच इथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालते. समुद्रसपाटीपासून २६२५ फूट उंचीवर असलेल्या माथेरानमध्ये वेगवेगळे पॉईंटस आहेत. पावसाळयात माथेरानचे जंगल पालथे घालणे एक अविस्मरणीय अनुभव असतो. गर्द हिरव्यागार झाडीतून चालताना एक वेगळ आनंद मिळतो. माथेरानमध्ये सहकुटुंब येणाऱ्यांसाठी रिसॉर्टचाही पर्याय उपलब्ध आहे.

माथेरान मुंबईपासून १०० तर पुण्यापासून १२० किलोमीटर अंतरावर आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटीहून तुम्ही ट्रेन पकडल्यानंतर दीड ते दोन तासात नेरळला पोहोचता.

नेरळला स्टेशनला उतरल्यानंतर तिथून तुम्ही टॅक्सीने किंवा टॉय ट्रेनने माथेरानच्या पायथ्याशी जाऊ शकता. टॅक्सीने हा प्रवास २० ते २५ मिनिटांचा आहे तर टॉय ट्रेन दोन ते तीन तास लागतात. माथेरानमध्ये वाहनांना परवानगी नाहीय. त्यामुळे दस्तुरी कार पॉईंटपर्यंत तुम्ही वाहन नेऊ शकता. तिथून मातीच्या रस्त्यावरुनच माथेरानची भ्रमंती करावी लागते. वयोवुद्ध व्यक्तिंसाठी इथे घोडयांची व्यवस्था आहे. इथली शांतता आणि गर्दी वनराईच्या प्रेमात पडल्याशिवाय तुम्ही राहणार नाही.

येऊर
येऊर ठाणे जिल्ह्यात असून मुंबईपासून फक्त २५ किलोमीटर अंतरावर आहे. पक्षी निरीक्षण आणि जंगल भ्रमंतीची आवड असलेल्या अनेकांची येऊरला पसंती असते. फक्त तास-दीडतासात तुम्ही येऊरला पोहोचू शकता. छोटया-छोटया टेकडया आणि जंगलामुळे इथे भटकंती करताना एक वेगळा आनंद मिळतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ४० किलोमीटरचा भाग येऊरमध्ये मोडतो. विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्ष्यांनी हे जंगल समृद्ध आहे. पावसाळयात येऊरच्या जंगलाचे सौंदर्य अधिक खुलून येते.

चिंचोटी
पावसाळयात धबधब्याला तरुणाईची विशेष पसंती असते. कडेकपारीतून कोसळणाऱ्या धबधब्याखाली उभे राहण्यात एक वेगळी मजा असते. पावसाळयात मुंबई-अहमदाबाद मार्गावरील चिंचोटी धबधब्याकडे तरुणाईची पावले वळतात. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी गर्द हिरव्यागार झाडीतून मार्ग काढावा लागतो. एक ते दीड तास पायपीट केल्यानंतर तुम्ही या धबधब्यापर्यंत पोहोचता. ट्रेनने नायगाव रेल्वे स्टेशनला उतरुन रिक्षाने तुम्हाला जाता येते.

संजय गांधी नॅशनल पार्क
संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबई जवळ असलेले उत्तम ठिकाण आहे. अनेक मुंबईकर पिकनिकचा प्लान आखतात तेव्हा हे ठिकाण त्यांच्या ध्यानी-मनीही नसते. मुंबई पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पावसाळयात एक वेगळा अनुभव मिळतो. १०३.८४ किलोमीटर पर्यंत नॅशनल पार्क पसरले आहे. वेगवेगळया प्रकारची झाडे, वनस्पती, प्राणी, पक्ष्यांनी हे जंगल समृद्ध आहे. या पार्कमध्ये सुद्धा पावसाळयात वेगवेगळया ठिकाणी नैसर्गिक धबधबे तयार होतात. शिवाय २४०० वर्षापूर्वीच्या कान्हेरी गुफा सुद्धा इथे आहेत. नॅशनल पार्कमध्ये तंबूमध्ये निवासाची सोय उपलब्ध आहे. ट्रेनने बोरीवली स्थानकावर उतरुन बस किंवा रिक्षाने इथे जाता येते.

गोराई
गोराई समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध असून मुंबईच्या उत्तरेला वसलेले एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. बोरीवली व भाईंदरवरुन तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. पश्चिम रेल्वे मार्गावरुन बोरीवलीच्या दिशेने जाणारी कोणतीही ट्रेन पकडा. प्रत्येक फास्ट ट्रेन बोरीवलीमध्ये थांबा घेते. बोरीवली स्थानकात उतरल्यानंतर तुम्ही बस किंवा रिक्षाने गोराईला पोहोचा. तिथून लाँचने तुम्हाला गोराई किनाऱ्यावर जाता येते. गोराईमध्ये रिसॉटर्स आणि राहण्याची व्यवस्था आहे. इथल्या किनाऱ्यावर फिरताना मनाला एक वेगळीच शांतता, प्रसन्नता मिळते.