Reliance Jio ची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना कंपनीकडून अनेक मोफत सुविधा देण्यात येतात. मोफत गाणी, चित्रपट याव्यतिरिक्त JioTV च्या माध्यमातून ग्राहकांना मोफत शेकडो चॅनल्सही पाहता येतात. सध्या मोफत मिळणाऱ्या अॅपपैकी JioTV हे अॅप सर्वाधिक पसंत करण्यात आलेले अॅप आहे. याद्वारे तब्बल 626 लाईव्ह टिव्ही चॅनल्स पाहता येतात.

नुकतेच Jio ने आपले JioTV हे अॅप अपग्रेड केले आहे. यामध्ये आता ग्राहकांसाठी पिक्चर-इन-पिक्चर(PIP) मोड फीचर देण्यात आले आहे. याद्वारे JioTV वर कोणताही कार्यक्रम पाहताना टेक्सटिंग, ब्राऊझिंग आणि टायपिंगही करता येणार आहे. जर या फीचरचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम JioTV च्या सेंटिंगमध्ये जाऊन काही बदल करावे लागतील. तसेच पिक्चर-इन-पिक्चर(PIP) मोडसाठी सेटिंगमध्ये जाऊन परवानगी द्यावी लागेल. हॅक्स क्वीनने यासंदर्भात एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये कशाप्रकारे यूजर्स पिक्चर-इन-पिक्चर(PIP) मोडचा वापर करू शकतात, याबाबत माहिती देण्यात आली आहे.

ज्यांच्याकडे अँड्रॉईड 8 किंवा त्यापेक्षा वरील व्हर्जन असलेला अँड्रॉईड मोबाईल असेल अशाच ग्राहकांना या फीचरचा वापर करता येणार आहे. सध्या रिलायंस जिओच्या JioTV या अॅपमध्ये विविध भाषांमधील 626 चॅनल्स पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच याद्वारे तब्बल 138 एचडी चॅनल्सचाही पाहता येतात.