डिसेंबर ३१ आता अगदी जवळ आला आहे, तुमच्यापैकी अनेकांचा वर्षाखेरीचा बोनस मिळायला आता सुरुवात झाली आहे. बोनस म्हणून मिळालेली रक्कम मजेसाठी खर्च करणे आवश्यक असले तरीही अर्थपूर्ण गुंतवणूकीसाठी काही रक्कम बाजूला ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय तुम्ही या रकमेतून तुमचे कर्ज कमी करु शकता. तुमच्या कष्टाच्या पैशाचा वापर करण्याच्या काही टिप्स…

कर्जाच्या मुदतपूर्व समाप्तीचा किंवा मुदतपूर्व परताव्याचा विकल्प निवडा

तुम्ही तुमच्या जादा रकमेला तुमच्या कर्जाच्या भागाला वेळेआधी भरण्यासाठी वापरु शकता. यामुळे तुमचे ईएमआयचे ओझे कमी होईल आणि तुम्हाला लवकरात लवकर कर्जमुक्त होता येईल. यामुळे तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर राखण्यासोबत गुंतवणूकीवर लक्ष केंद्रित करण्याची मुभा मिळेल.

आपत्तीसाठी रोख रक्कम बाजूला ठेवणे

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कोणत्याही अनपेक्षित घटनेपासून उदा. आरोग्यासंबंधीत आपत्ती किंवा अचानक बेरोजगार होण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी रोख रक्कम जमवावी. जर तुमच्याकडे ही रक्कम आधीपासून असेल, तर तुमच्या या रकमेमध्ये भर टाकण्यासाठी आता मिळालेल्या जादा पैशाचा उपयोग करावा. आपत्तीकाळासाठी असलेली रक्कम तुमचा सहा ते बारा महिन्यांचा पगार असू शकते.

आकर्षक बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा

जर तुमच्या कर्जाची काळजी घेण्यात आली असेल आणि तुमच्याकडे आपत्तीकाळासाठी निधी तयार असेल तर, तुम्ही संपत्ती निर्माणासाठी आणि महागाईचा सामना करण्यासाठी तुमचे पैसे गुंतवू शकता. तुमच्या आर्थिक उद्देशाच्या, जोखीम घेण्याच्या प्रवृत्तीच्या आणि तुमचे उद्देश मिळवण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या वेळेच्या आधारावर तुम्ही संपत्तीची निवड करु शकता. मुदत ठेव, पीपीएफ आणि म्युच्युअल फंड्स ही काही गुंतवणूक साधने तुम्ही चोखाळू शकता जी पाच वर्षे किंवा जास्त काळाने उत्तम परतावा देतात.

विमा टॉपअप करणे

तुमच्याकडच्या असलेल्या विम्यामध्ये भर टाकण्याचा विचार तुम्ही करत असाल तर शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नका. इश्युरन्स कव्हरेज वाढवण्यासाठी तुमचा बोनस वापरा. तुमच्या गरजा पहा आणि अतिरिक्त रकमेचा वापर करुन योग्य कव्हरेज खरेदी करा. हेल्थ केअरचा खर्च काळानुरुप वाढत आहे, त्यामुळे योग्य कव्हरने स्वत:ला सुसज्ज करणे केव्हाही उत्तम ठरेल. अखेरची पण शेवटची नसलेली बाब म्हणजे तुमच्या अपेक्षांचा आढावा घ्या आणि त्यांना अपेक्षेहून लवकर पूर्ण करण्यासाठी प्रत्येक धेयामध्ये अंशत: तरी योगदान द्या.

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार