News Flash

Poco च्या स्वस्त स्मार्टफोनची भारतात ‘डिमांड’, विक्रीचा आकडा 10 लाखांपार

10 लाखांपेक्षा जास्त स्मार्टफोन्सची विक्री

पोको (Poco) कंपनीचा Poco C3 या स्मार्टफोनला भारतात चांगली मागणी आहे. कारण आतापर्यंत भारतात 10 लाखांपेक्षा जास्त Poco C3 स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. कंपनीकडून गुरूवारी ट्विटरद्वारे याबाबत माहिती देण्यात आली. पोको इंडिया कंपनीने Poco C3 हा स्मार्टफोन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात लाँच केला होता. हा फोन कंपनीच्या बेस्ट सेलिंग स्मार्टफोन्सपैकी एक आहे. भारतीय बाजारात पोकोच्या या बजेट स्मार्टफोनची टक्कर रिअलमी सी 11, इन्फीनिक्स स्मार्ट 4 प्लस आणि सॅमसंग गॅलेक्सी एम 01 यांसारख्या फोन्ससोबत आहे.

24 जानेवारीपर्यंत ऑफर-
24 जानेवारीपर्यंत Poco C3 स्मार्टफोन खास किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. हा फोन 6,299 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. ही किंमत 3जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर, फोनच्या 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज व्हेरिअंट 7,199 रुपयांमध्ये उपलब्ध झालाय. ही स्पेशल ऑफर फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर लागू असेल.


स्पेसिफिकेशन्स
पोको सी 3 स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप-स्टाइल नॉचसोबत 6.53 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. हा फोन आर्क्टिक ब्लू, लाइम ग्रीन आणि मॅट ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये मिळतो. पोकोचा हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 12 वर कार्यरत असतो. फोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसरचा सपोर्ट असून 4GB पर्यंत रॅमचा पर्याय आहे. पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉटचा पर्याय आहे, याद्वारे फोनची स्टोरेज मेमरी 512GB पर्यंत वाढवता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 4:20 pm

Web Title: poco c3 crosses 1 million sales mark in india and also gets a limited period discount sas 89
Next Stories
1 Reliance Jio युजर्ससाठी ‘गुड न्यूज’, आता ‘या’ स्वस्त प्लॅनमध्ये मिळणार जास्त 4G डेटा
2 मारुती, महिंद्रानंतर Tata Motors ने दिला झटका; सर्व कारच्या किंमती वाढल्या
3 Tesla चे सीईओ एलन मस्क देणार तब्बल 730 कोटी रुपये बक्षीस, फक्त करावं लागेल ‘हे’ काम
Just Now!
X