स्मार्टफोन निर्माता कंपनी Poco आज, मंगळवार आपला नवीन स्मार्टफोन Poco C3 लाँच करणार आहे. Poco कंपनीने ट्विट करत स्मार्टफोन लाँच करण्यासंदर्भात माहिती दिली आहे. दुपारी १२ वाजता हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. या फोन्समध्ये रियर ट्रिपल कॅमेरा सेटअप असून याचा प्रायमरी कॅमरा 13MP चा असेल. 13MP चा प्रायमरी कॅमेरासह मॅयक्रो शूटर आणि डेप्थ सेंसर असेल. तर 5MP चा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. याच्या बॅटरीविषयी बोलायचे झाले तर, यात 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. यात USB Type C चार्जिंग पोर्ट असू शकते.

पोको इंडियाने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत याआधीच स्मार्टफोन्सबद्दल माहिती दिली होती. या फोनच्या आकर्षक आणि तितक्याच खास वैशिष्ट्यांची या व्हिडीओत माहिती दिली आहे. फ्लिपकार्टवर दुपारी १२ वाजता ऑनलाईन लाँचिग पाहू शकता.

सुत्रांच्या माहितीनुसार पोकोच्या या स्मार्टफोन्सची किंमत १० ते १२ हजार रुपयांच्या आतमध्येच असण्याची शक्यता आहे. तसेच यात MediaTek Helio G35 चिपसेट असू शकते. हा अॅनड्रॉईड 10 वर आधारित MIUI 12 सह येऊ शकतो. यात 4GB रॅम आणि 64GB चे स्टोरेज असू शकते.