19 September 2020

News Flash

Poco F2 Pro येतोय , सोशल मीडियावर डिटेल्स झाले ‘लीक’

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला स्मार्टफोन ‘पोको F2 प्रो’चे डिटेल्स सोशल मीडियावर झाले 'लीक' ...

Poco F2 Pro to launch in India soon. (Image: Redmi K30 Pro)

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला स्मार्टफोन ‘पोको F2 प्रो’ लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर या स्मार्टफोनबाबत काही डिटेल्स लीक झाले आहेत.

सोशल मीडियावर लीक झालेल्या माहितीनुसार, हा फोन कंपनी 12 मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्पेनमधून ‘ग्लोबल लॉन्च’ करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.व्हाइट, पर्पल, ग्रे आणि ब्लू अशा चार कलर्सच्या पर्यायांमध्ये हा फोन लॉन्च होईल, असं समजतंय. मात्र, अद्याप कंपनीने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.  कंपनी आपला स्मार्टफोन रेडमी K30 प्रो (Redmi K30 Pro) भारतात ‘पोको F2 प्रो’ म्हणून लॉन्च करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, कंपनी K30 प्रो भारतात ‘पोको F2’ म्हणून लॉन्च करेल. पण, त्यानंतर ‘पोको ब्रँड’चे जनरल मॅनेजर सी. मनमोहन यांनी हे वृत्त नाकारले होते. मात्र, आता कंपनी Redmi K30 Pro हा फोन भारतात पोको F2 म्हणनू नव्हे तर पोको F2प्रो म्हणून लॉन्च करेल अशी चर्चा आहे. ‘गुगल प्ले सपोर्ट पेज’मध्ये Poco F2 Pro स्मार्टफोनसाठी कोडनेम ‘Imi’ चा वापर करण्यात आल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे कंपनीने K30 प्रोसाठीही हाच कोडनेम ठेवला आहे. दोन्ही फोनसाठी एकच कोडनेम असल्यामुळे कंपनी भारतात K30 Pro हा फोन रिब्रँडेड व्हर्जनमध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे.

काय असणार फीचर्स? –
जर, रेडमी के30 प्रो रिब्रँडेड व्हर्जन पोको F2 प्रोमध्ये लॉन्च करण्यात आला तर या फोनमध्ये HDR10+ सपोर्टसह 6.67 इंच फुल एचडी+ डिस्प्ले असेल. पॉप-अप सेल्फी कॅमेरा डिझाइनसह या फोनमध्ये 8जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. 5G सपोर्ट या फोनमध्ये असेल तसेच स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरसोबत UFS 3.1 स्टोरेज आहे. बराच वेळ वापरल्यानंतर किंवा गेम खेळताना फोन गरम होऊ नये यासाठी खास ‘व्हेपर चेम्बर लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी’चा वापर करण्यात आला आहे.

किंमत :-
Redmi K30 Pro हा फोन चीनमध्ये तीन व्हेरिअंट्समध्ये येतो. चीनमध्ये हा फोन तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असून तिन्ही व्हेरिअंट्सची किंमत 32 ते 39 हजार रुपयांच्या घरात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 10:50 am

Web Title: poco f2 pro launch details leaked could be announced on may 12 sas 89
Next Stories
1 काय राव… पोलीस बंदोबस्तात दारुचं दुकान उघडलं पण साधं एक गिऱ्हाईक आलं नाही
2 Video : ‘लॉकडाउन’दरम्यान शुकशुकाट असलेल्या एसबीआयच्या ATM मध्ये घुसलं माकड, आणि…
3 “संपूर्ण जगाच्या नकाशावर शोधून सापडणार नाही एवढी सुरक्षा…”; महाराष्ट्र पोलिसांचे हटके Tweet
Just Now!
X