अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला स्मार्टफोन ‘पोको F2 प्रो’ अखेर उद्या(दि.१२) लॉन्च होणार आहे. कंपनीने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली असून एक टिझर व्हिडिओही शेअर केला आहे. स्पेनमधून  ‘पोको F2 प्रो’ या नव्या स्मार्टफोनचं ग्लोबल लॉन्चिंग केलं जाईल अशी शक्यता आहे.

उद्या ग्लोबल लॉन्चिंग झाल्यावर लगेचच हा फोन भारतात उपलब्ध होणार का? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. सोशल मीडियावर या स्मार्टफोनबाबत काही डिटेल्स लीक झाले आहेत. व्हाइट, पर्पल, ग्रे आणि ब्लू अशा चार कलर्सच्या पर्यायांमध्ये हा फोन लॉन्च होईल, असं समजतंय. मात्र, अद्याप कंपनीने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.  कंपनी आपला स्मार्टफोन रेडमी K30 प्रो (Redmi K30 Pro) भारतात ‘पोको F2 प्रो’ म्हणून लॉन्च करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, कंपनी K30 प्रो भारतात ‘पोको F2’ म्हणून लॉन्च करेल. पण, त्यानंतर ‘पोको ब्रँड’चे जनरल मॅनेजर सी. मनमोहन यांनी हे वृत्त नाकारले होते. मात्र, आता कंपनी Redmi K30 Pro हा फोन भारतात पोको F2 म्हणनू नव्हे तर पोको F2प्रो म्हणून लॉन्च करेल अशी चर्चा आहे. ‘गुगल प्ले सपोर्ट पेज’मध्ये Poco F2 Pro स्मार्टफोनसाठी कोडनेम ‘Imi’ चा वापर करण्यात आल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे कंपनीने K30 प्रोसाठीही हाच कोडनेम ठेवला आहे. दोन्ही फोनसाठी एकच कोडनेम असल्यामुळे कंपनी भारतात K30 Pro हा फोन रिब्रँडेड व्हर्जनमध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे.

काय असणार फीचर्स? –
जर, रेडमी के30 प्रो रिब्रँडेड व्हर्जन पोको F2 प्रोमध्ये लॉन्च करण्यात आला तर या फोनमध्ये HDR10+ सपोर्टसह 6.67 इंच फुल एचडी+ डिस्प्ले असेल. पॉप-अप सेल्फी कॅमेरा डिझाइनसह या फोनमध्ये 8जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. मागील बाजूला 64 MP कॅमेऱ्यासह चार कॅमेऱ्यांचा सेटअप मिळेल.  5G सपोर्ट या फोनमध्ये असेल तसेच स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरसोबत UFS 3.1 स्टोरेज आहे. बराच वेळ वापरल्यानंतर किंवा गेम खेळताना फोन गरम होऊ नये यासाठी खास ‘व्हेपर चेम्बर लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी’चा वापर करण्यात आला आहे.

किंमत :-  Poco F2 Pro हा फोन किंमतीच्या बाबतीत महागडा असण्याची शक्यता आहे. ४० ते ४५ हजार रुपयांपर्यंत या फोनची किंमत असू शकते.