भारतात पोको (Poco) कंपनीचे दोन बजेट स्मार्टफोन स्वस्त झाले आहेत. कंपनीने आपल्या Poco M2 आणि Poco C3 या दोन फोनच्या किंमतीत कपात केली आहे. दोन्ही फोनमध्ये परवडणाऱ्या किंमतीत दमदार फिचर्स मिळतात.

Poco M2 नवीन किंमत
पोकोने आपला Poco M2 हा स्मार्टफोन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 6GB RAM आणि 64GB व 128 जीबी स्टोरेजसह लाँच केला होता. भारतात आता फोनच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये झालीये. तर 6GB RAM आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये झालीये. दोन्ही फोनच्या किंमतीत अनुक्रमे एक हजार आणि पंधराशे रुपयांची कपात करण्यात आली आहे.

Poco C3 नवीन किंमत
पोकोने आपल्या एंट्री लेवल फोन Poco C3 च्या किंमतीत 500 रुपयांची कपात केलीये. त्यामुळे या फोनच्या 3GB + 32GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 7,499 रुपये आणि 4GB + 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 8,499 रुपये झाली आहे. एंट्री लेवल फोन पोको सी3 मध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असून MediaTek Helio G35 प्रोसेसरचा सपोर्ट आहे. या फोनमध्ये कंपनीने ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 5000 mAh क्षमतेची दमदार बॅटरीही दिली आहे.