‘पोको’चा नवीन स्मार्टफोन Poco M2 आज(दि.8) भारतात लाँच होणार आहे. ‘पोको इंडिया’कडून या फोनच्या लाँचिंगसाठी व्हर्च्युअल इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजेपासून हा इव्हेंट कंपनीच्या सोशल मीडिया चॅनेल्सद्वारे लाइव्ह बघता येईल. कंपनी गेल्या काही दिवसांपासून या फोनचे टीझर्स जारी करत आहे. हा भारतातील 6GB रॅम असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा फोन 6जीबी रॅम आणि वॉटरड्रॉप स्टाइल नॉचसोबत येईल.

काय असतील स्पेसिफिकेशन्स? :-
कंपनीने यापूर्वी जारी केलेल्या टीझरनुसार या फोनमध्ये फुल एचडी+ डिस्प्ले असेल. या नवीन पोको फोनमध्ये फोटोग्राफीसाठी मागील बाजूला एलईडी फ्लॅशसोबत चार कॅमेऱ्यांचा सेटअप असू शकतो. कॅमेरा सेटअपच्या खाली रिअर-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असेल. फोनमध्ये फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळेल.  6GB रॅमसोबत 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी या फोनमध्ये असेल.

किती असेल किंमत? :-
Poco M2 हा स्मार्टफोन म्हणजे जुलै महिन्यात कंपनीने लाँच केलेल्या Poco M2 Pro स्मार्टफोनचा लाइट व्हर्जन फोन असेल. Poco M2 Pro पेक्षा या नवीन फोनची किंमत कमी असेल अशीही चर्चा आहे. 13 हजार 999 रुपये इतकी Poco M2 Pro ची बेसिक किंमत आहे. याशिवाय नवीन पोको फोनचा टीझर फ्लिपकार्टवर जारी झाला आहे, त्यामुळे फ्लिपकार्टवरुनच फोनची विक्री होणार हे स्पष्ट झालं आहे.