Poco M2 Pro हा नवीन ‘मिड रेंज’ सेगमेंटमधला स्मार्टफोन भारतात या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच लाँच झाला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी या फोनसाठी पहिल्या सेलचं आयोजन करण्यात आलं होतं, पण पहिल्या सेलमध्ये काही मिनिटांतच हा फोन आउट ऑफ स्टॉक झाला. शानदार प्रतिसाद मिळाल्याने सेल सुरू होताच हा फोन सोल्ड आउट झाला होता. पण आता कंपनी पुन्हा एकाहा हा फोन फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध करणार आहे.  30 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपासून फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर या फोनच्या विक्रीसाठी कंपनीने खास फ्लॅश सेलचं आयोजन केलं आहे. 15 हजारांपेक्षा कमी किंमतीच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आणि क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. नवीन Poco स्मार्टफोनमध्ये होल-पंच डिस्प्ले आणि क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. एकूण पाच कॅमेरे असलेल्या या स्मार्टफोनमध्ये प्रो कलर मोड, प्रो व्हिडिओ मोड आणि RAW मोड यांसारखे अनेक कॅमेरा मोड आधीपासून देण्यात आले आहेत. पोको एम2 प्रो, हा भारतात Poco ब्रँडअंतर्गत तिसरा फोन आहे. मार्केटमध्ये हा फोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

पोको एम2 प्रोच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमधील सर्वात पॉवरफुल व्हेरिअंट म्हणजे 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 16,999 रुपये आहे. आउट ऑफ द ब्लू, ग्रीन अँड ग्रीनर आणि टू शेड्स ऑफ ब्लॅक अशा तीन कलरमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. फ्लिपकार्टद्वारे या फोनची भारतात विक्री होईल. फोनच्या विक्रीसाठी 14 जुलै रोजी पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे.

Poco M2 Pro फीचर्स :-
ड्युअल सिम सपोर्ट असलेला Poco M2 Pro अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 for Poco वर कार्यरत आहे. यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह 6.67 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले आहे. यात ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720जी प्रोसेसरचा वापर करण्यात आला असून 6 जीबीपर्यंत LPDDR4X RAM आहे. पोको एम2 प्रोमध्ये चार रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील प्राइमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-अँगल लेंन्स, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये नाइट मोड सपोर्ट असलेला 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे. 128 जीबी मेमरी असून माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे. फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5,020 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी असलेल्या या फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सरही आहे.