या महिन्याच्या सुरूवातीलाच पोको कंपनीने लाँच केलेला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Poco M3 पुन्हा एकदा खरेदी करण्याची संधी आहे. आज (दि.१९) या फोनसाठी  ‘फ्लॅश सेल’चं आयोजन करण्यात आलं आहे. या लेटेस्ट बजेट स्मार्टफोनला भारतीय ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. कारण, यापूर्वी ९ फेब्रुवारी रोजी या फोनसाठी पहिल्यांदाच फ्लॅश सेलचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पहिल्याच सेलमध्ये तब्बल दीड लाखांपेक्षा जास्त Poco M3 फोनची विक्री झाली होती. तर, १६ तारखेला झालेल्या दुसऱ्या सेलमध्येही तुफान प्रतिसाद मिळाला होता.

Poco M3 ऑफर :-

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित
Mumbai Metro Introduces Wristband Ticketing for Metro 1 Route No Need for Paper or Mobile Tickets
‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी आता मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकिट सेवा कार्यान्वित

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर आज (दि. १९) दुपारी १२ वाजेपासून Poco M3 साठी फ्लॅश सेलला सुरूवात झाली आहे. सेलमध्ये फोनच्या खरेदीवर अनेक आकर्षक ऑफर्सही आहेत. फ्लिपकार्टवरील सेलमध्ये हा फोन Yes बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे EMI वर खरेदी केल्यास 7 टक्के इस्टंट डिस्काउंट मिळेल.  तर,  ‘फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड’द्वारे खरेदी केल्यास 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅकचा फायदा मिळेल. याशिवाय हा फोन तुम्ही 1,834 रुपये दरमहा नो-कॉस्ट EMI वरही खरेदी करु शकतात. तसेच, एक्स्चेंज ऑफरअंतर्गत 10 हजार 350 रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंटही मिळेल.

Poco M3 स्पेसिफिकेशन्स :-

दोन व्हेरिअंट : 6जीबी रॅम+64जीबी इंटरनल स्टोरेज आणि 6जीबी+128जीबी इंटरनल स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे.

पोको M3 फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :- या फोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले असून डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनही आहे. 6जीबी रॅम आणि 128जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर आहे.

कॅमेरा :- फोटोग्राफीसाठी पोको M3 फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील 48 मेगापिक्सेलच्या प्रायमरी सेन्सरसोबत एक 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्स आणि एक 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे.

सेल्फी कॅमेरा : याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेराही मिळेल.

बॅटरी :- 512जीबीपर्यंत माइक्रो एसडी कार्डचा सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये कंपनीने 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे.

कनेक्टिव्हिटी :- कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये IR ब्लास्टर, 4G VoLTE , वाय-फायशिवाय अन्य सर्व स्टँडर्ड पर्याय आहेत.

पोको M3 किंमत  :- 6जीबी रॅम+64जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 10 हजार 999 रुपये आहे. तर, 6जीबी+128जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11 हजार 999 रुपये आहे.