Poco कंपनीने गेल्या आठवड्यातच भारतीय बाजारात आपला लेटेस्ट स्मार्टफोन ‘Poco X3’ लाँच केला असून आज (दि. 29) पहिल्यांदाच हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीने या फोनसाठी खास सेलचं आयोजन केलं आहे. 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी, 64MP चा मुख्य कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 732जी ऑक्टा-कोर प्रोसेसर असलेला हा शानदार फोन सेलमध्ये आकर्षक ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी आहे.

सेल आणि ऑफर्स :

ग्राहक आज दुपारी 12 वाजेपासून Poco X3 हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर प्लॅश-सेलमध्ये खरेदी करु शकतात. कोबाल्ट ब्लू आणि शॅडो ग्रे अशा दोन रंगाच्या पर्यायात हा फोन उपलब्ध आहे. 6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज, 6जीबी रॅम+128जीबी स्टोरेज आणि 8जीबी रॅम+128जीबी स्टोरेज अशा तीन व्हेरिअंटमध्ये हा फोन खरेदी करता येईल. सेलमध्ये फोनच्या खरेदीवर काही ऑफर्सही आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 5 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय, अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड आणि फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी करणाऱ्यांनाही 5 टक्के सवलत मिळेल. तसेच, दरमहा 1,889 रुपयांच्या आकर्षक नो-कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआयचा पर्यायही ग्राहकांना मिळेल.

स्पेसिफिकेशन्स :

Poco X3 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्लेसोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. 8जीबीपर्यंत रॅमची क्षमता असलेल्या या फोनमध्ये प्रोसेसरसाठी स्नॅपड्रॅगन 732G SoC चिपसेट आहे. फोटॉग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. यात 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सेलचा वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो शूटर असा सेटअप आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. तसेच, फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये असून 128जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मेमरी आहे. आवश्यकता असल्यास मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे.

किंमत :

6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज : 16,999 रुपये
6जीबी रॅम+128जीबी स्टोरेज : 18,499 रुपये
8जीबी रॅम+128जीबी इंटर्नल स्टोरेज : 19,999 रुपये