‘पोको इंडिया’ने आज(दि.30) आपला नवीन स्मार्टफोन Poco X3 PRO भारतीय बाजारात लाँच केला. Poco X3 PRO स्मार्टफोनमध्ये दमदार  पर्फॉर्मन्ससाठी स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर देण्यात आलं आहे. शिवाय फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आहे. Poco X3 PRO मध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर असून 5160 mAh क्षमतेच्या दमदार बॅटरीसह 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्टही आहे. जाणून घेऊया या शानदार स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स :-

Poco X3 PRO किंमत :-
Poco X3 PRO हा फोन कंपनीने 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम अशा दोन प्रकारात आणला आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या Poco X3 PRO ची किंमत 18 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 8जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 20 हजार 999 रुपये आहे. हा फोन गोल्डन ब्राँझ, ग्रेफाइट ब्लॅक आणि स्टील ब्लू अशा तीन रंगात खरेदी करता येईल. 6 एप्रिलपासून ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर विक्री सुरु होईल. लॉचिंग ऑफरअंतर्गत आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवर 1,000 रुपयांची सवलतही मिळेल.

Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
jaguar land rover
लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प
mutual fund, multi cap fund
मल्टिकॅप फंड : त्रिवेणी संगम…
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल

Poco X3 Pro स्पेसिफिकेशन्स
Poco X3 Pro मध्ये अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12 चा सपोर्ट असून फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शनही मिळेल. तसेच या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी Adreno 640 GPU, 8 जीबीपर्यंत LPDDR4X रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी यात मागील बाजूला क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. तर, अन्य तीन कॅमेरे अनुक्रमे 8 मेगापिक्सेल (अल्ट्रा वाइड), 2 मेगापिक्सेल (मॅक्रो लेन्स) आणि 2 मेगापिक्सेल (डेफ्थ सेन्सर) आहेत. याशिवाय सेल्फीसाठी यात पुढील बाजूला 20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे.

Poco X3 Pro ची बॅटरी
कनेक्टिव्हिटीसाठी पोकोच्या या फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS, USB टाईप-सी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. फोनमध्ये ड्युअल स्पीकर असून फोनला वॉटर व डस्टप्रूफसाठी IP53 रेटिंग मिळाली आहे. Poco X3 Pro मध्ये कंपनीने साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर फिचरही दिलं आहे. या फोनमध्ये 5160mAh क्षमतेची दमदार बॅटरी असून ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.