News Flash

अटी न आवडल्यास १५ दिवसांत रद्द करता येणार पॉलिसी, विमाधारकांसाठी चांगली बातमी

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) जारी केलं परिपत्रक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

विमाधारकांसाठी चांगली बातमी आहे, कारण भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) आता पॉलिसी खरेदीदारांना काही अतिरिक्त अधिकार दिले आहेत. याबाबत आयआरडीएआयने २३ मार्च रोजी एक परिपत्रक जारी केलं आहे. जर पॉलिसी खरेदी करणार्‍या व्यक्तीला ‘स्टँडर्ड पर्सनल अपघाताच्या (Standard Personal Accident Cover) अटी मान्य किंवा आवडल्या नसतील किंवा त्याद्वारे त्याची आवश्यकता पूर्ण होत नसेल, तर पॉलिसी खरेदीच्या 15 दिवसांच्या आत ग्राहक पॉलिसी परत करू शकतो, असं IRDAI ने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

पॉलिसी खरेदी केल्यानंतर खरेदीदाराला अटी व शर्तींचा आढावा घेण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी मिळेल, असे IRDAI ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता जर खरेदीदाराला अटी मान्य नसतील तर तो १५ दिवसांमध्ये पॉलिसी परत करु शकणार आहे. या पंधरवाड्याला ‘फ्री लूक पीरेड’ नाव देण्यात आले आहे.

फेब्रुवारीमध्ये स्टँडर्ड पर्सनल अपघात कव्हरसाठी मार्गदर्शक सूचना देताना IRDAI ने फ्री लूक पीरेडबाबत माहिती दिली नव्हती. त्यामुळे, खरेदीदाराला पॉलिसीच्या अटी आवडल्या नाहीत तर काय होणार? ‘फ्री लूक पीरेड’मध्ये पॉलिसी रद्द करण्याची संधी त्यांना मिळणार की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पण, आता IRDAI ने स्पष्ट केलंय की, ‘फ्री लूक पीरेड’चा फायदा केवळ नवीन पॉलिसी खरेदीदारांनाच होईल, पॉलिसी नुतनीकरण करणाऱ्यांना याचा फायदा होणार नाही. शिवाय, जर ‘फ्री लूक पिरेड’मध्ये जर विमाधारकाने कोणताही दावा केला नाही तर विमा कंपनीकडून केलेल्या आरोग्य तपासणीचे पैसे परत केले जातील. तसेच मुद्रांक शुल्कही परत केले जातील, असंही IRDAI ने नमूद केलंय.

दरम्यान, बहुतेक विमा पॉलिसींमध्ये ‘फ्री लूक पिरेड’ची तरतूद असते, त्यामुळे आपल्याला विशिष्ट कालावधीत पॉलिसी परत / रद्द करण्याचे स्वातंत्र्य मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 10:05 am

Web Title: policy buyers now to get 15 day free look period on standard personal accident cover check details sas 89
Next Stories
1 OnePlus 9 सीरिज भारतात लाँच, कंपनीने OnePlus Watch देखील आणलं; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
2 Vi युजर्सना झटका, सर्व सर्कलमध्ये महाग झाले प्लॅन्स; १०० रुपयांपर्यंत वाढली किंमत
3 स्वस्तात Redmi Note 10 Pro खरेदीची संधी, मिळेल 64MP क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप; जाणून घ्या सविस्तर
Just Now!
X