– डॉ अनुपम दुर्गादास टाकळकर, औरंगाबाद.

येत्या १९ जानेवारीला पुन्हा एकदा पल्स पोलिओ अभियान राबविण्यात येणार आहे. या पल्स पोलिओ लसीकरणा विषयी बऱ्याच पालकांमध्ये आज देखील गैरसमज आहेत. या लसीकरणाचे किती अनन्यसाधारण महत्त्व आहे, विशेष करून भारतासारख्या खंडप्राय देशात या सार्वजनिक पोलिओ लसीकरण करण्याची किती गरज आहे याविषयी घेतलेला हा आढावा.

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प
UPSC Preparation Geography is an important topic career
upsc ची तयारी: भूगोल (भाग १)

लसीकरण का ?

पोलिओची लागण झालेल्या दोनशे व्यक्तींपैकी एका व्यक्तीला कायमचे अपंगत्व येते. या अपंगत्व आलेले लोकांपैकी दहा टक्के रुग्ण हे श्वासोच्छ्वासाचे स्नायु पंगू झाल्यामुळे दगावतात. एकदा एखाद्या व्यक्तीला पोलिओमुळे अपंगत्व आले तर त्याला काहीच इलाज नसतो. एखाद्या आजाराला इलाजच नाही असे जेव्हा असते तेव्हा त्याच्या प्रतिबंधात्मक उपायांची किती नितांत गरज आहे हे अधोरेखित होते. त्यामुळे प्रभावी लसीकरण हा एकमेव पर्याय आपल्या हातात उरतो.

पोलिओ कसा होतो?

जेथे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, जेथे स्वच्छता व्यवस्थित नसते तेथे पोलिओचे संक्रमण सहजतेने होते. पोलिओ बाधित रुग्णाच्या विष्ठेतून हे व्हायरस वातावरणात मिसळतात. दूषित पाण्याचा संपर्क आल्याने, असे पाणी पिल्याने मुलांना पोलिओ व्हायरस ची लागण होते. लस न दिलेल्या बालकांच्या पोटात जेव्हा हा विषाणू तोंडावाटे जातो तेव्हा रुग्णाला ताप, उलट्या-जुलाब असा त्रास होतो. बरेच रुग्ण यातून बरे देखील होतात. परंतु दर दोनशे रुग्णांपैकी एका रुग्णाच्या जेव्हा हे विषाणू नर्व्हस सिस्टिमवर हल्ला करतात तेव्हा त्यांना पायाचे कायमचे पंगुत्व येते. हे अपंगत्व हे कायमचे असल्यामुळे या पोलिओ व्हायरस पासून वाचण्यासाठी लसरूपी कवच आपल्या बालकांना देणे किती आवश्यक आहे हे यावरून सिद्ध होते.

आपला देश तर पोलिओमुक्त झाला आहे तरीपण पुन्हा पल्स पोलिओ मोहीम चे एवढे महत्त्व का?

भारतातील आखेरचा पोलिओ रुग्ण 2011मध्ये आढळला आणि 1978 मध्ये सुरू झालेले पोलिओ लसीकरण आणि पुढे 1995 पासून व्यापक पल्स पोलिओ लसीकरण अभियानाच्या अथक परिश्रमानंतर भारत 27 मार्च 2014 रोजी पोलिओमुक्त घोषित करण्यात आला. असे असताना बर्याच पालकांना हा प्रश्न पडतो की गेल्या नऊ वर्षात पूर्ण भारतात एकही पोलिओचा रुग्ण आढळला नाही तरीदेखील मी माझ्या मुलाला/मुलीला पोलिओची लस देण्याविषयी डॉक्टर मंडळी का एवढे आग्रही असतात? याचं उत्तर सोप आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात पोलिओच्या पुनर् संक्रमणाचा धोका नाकारता येत नाही. आजही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही राष्ट्रात पोलिओ सक्रिय आहे. 2019 मध्ये पाकिस्तान मध्ये एकशे सत्तर तर अफगाणिस्तान मध्ये सव्वीस पोलिओच्या नवीन केसेस आढळल्या, ही खरोखर चिंतेची बाब आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोलिओ व्हायरस ची कोणतीही लक्षणे नसलेला परंतु पोलिओ व्हायरसनी संक्रमित असणारा या दोन्ही देशांत पैकी एकातून आलेल्या व्यक्ती द्वारे हा व्हायरस आपल्या देशात बेमालूमपणे सहज शिरकाव करू शकतो. काही पालकांना ही बाब कपोलकल्पित आहे असे वाटत असेल तर त्यांच्यासाठी एक फार ठळक उदाहरण मला येथे नमूद करावे वाटते. आपलाच दुसरा शेजारी चीन सन 2000 मध्ये पोलिओमुक्त झाला होता. परंतु पोलिओ मुक्त झाल्यानंतर तब्बल दहा वर्षानंतर म्हणजे जुलै ते ऑक्टोबर 2011 दरम्यान चीन मध्ये पोलिओमुळे अपंगत्व आलेले एकवीस रुग्ण आढळले! त्यापैकी दोन व्यक्तींचा मृत्यू देखील झाला. चीनमध्ये जेंव्हा या व्हायरसच्या प्रकाराचे अध्ययन झाले त्यावरून असा निष्कर्ष समोर आला की या व्हायरसचा उगम पाकिस्तान मध्ये होता. त्यामुळे आपल्या देशात यापुढे पोलिओ कधीच आक्रमण करणार नाही या फाजील आत्मविश्वासात न राहता शासनाच्या या पल्स पोलिओ मोहिमेत आपण सहभाग नोंदवावा.

काही पालकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो मी तर आत्ताच काही दिवसांपूर्वी मी माझ्या पाल्याला माझ्या डॉक्टरांकडून पोलिओची लस दिलेली आहे मग पुन्हा या सरकारी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे दरम्यान लस मी माझ्या पाल्याला का देऊ?

जेव्हा आपण एका बालकाला पोलिओची लस देतो तेव्हा ती त्या एकट्या मुलाला पोलिओ पासून संरक्षित करते. परंतु जेव्हा पूर्ण समाजाचे जेव्हा व्यापक लसीकरण केले जाते तेव्हा पूर्ण समाजाचीच रोगप्रतिकारशक्ती वाढत असते ज्याला “हर्ड ईम्युनीटी” वाढणे असे म्हणतात. पोलीओ सारख्या आजारांमध्ये मध्ये ही “हर्ड इम्युनिटी” वाढणे हे फार गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या देशात एकंदरीतच मुलांचे लसीकरण आणि ‘संपुर्ण’ लसीकरण या बाबतीत थोडी उदासीनताच आहे. भारतात अपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांची संख्या ही साधारणतः 32% एवढी जास्त आहे. त्यामुळे या अपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांना लस मिळणेही गरजेचे असते. त्यामुळे आधी कितीही वेळा तुम्ही पोलिओची लस घेतली असेल तरीदेखील तुम्ही या पल्स पोलिओ लसीकरण दरम्यान आपल्या बालकांना अवश्य लस द्या. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही भूतकाळात चार पाच वेळा पोलिओ ची लस आपल्या मुलांना दिली असेल आणि परत एकदा पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान लस दिली तर त्याचा अतिरिक्त लसीकरणामुळे ओव्हरडोस होईल का काय अशी काही पालकांच्या मनात शंका असते.परंतु या लसीचा ओव्हरडोस होत नाही. त्यामुळे भूतकाळात लस घेतली असेल तरीही पुन्हा एकदा लस घ्यायला काही हरकत नाही. त्याने अधिकचेच संरक्षणच मिळेल

अफवा -फार मोठा अडथळा.

पोलिओ लस विषयीच्या अफवा हा व्यापक लसीकरण मोहीमेला फार मोठा अडथळा आहे. काही पाल्यांना असे वाटते की ही लस दिल्यानंतर आपलं मुलाच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होईल. काहींना वाटते पोलिओ ड्रॉप्स हे प्राण्यांच्या रक्तघटकांपासून बनवलेले असतात. काहींना वाटते की नवजात शिशूंना आणि आजारी बालकांना लसीकरण अजिबात करण्यात येऊ नये. या आणि अशा असंख्य गैरसमजुतीमुळे काही पालक आपल्या मुलांना पल्स पोलिओ दरम्यान लस देण्यास इच्छुक नसतात. त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही डॉक्टर्स, इंडियन मेडिकल असोसिएशन, भारतीय बालरोग संघटना या व अशा अनेक डॉक्टरांच्या विविध संघटना, शासन, महानगरपालिका, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपापल्या परीने काम करत असतात. माध्यमं देखिल वृत्तपत्र, आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून समाजामध्ये पोलिओ लस आणि लसीकरणा बद्दलचे गैरसमज दूर करण्याचे महत्वाची कामगिरी बजावत असतात. त्यामुळे आपले देखील हे कर्तव्य आहे की आपल्या मनातील गैरसमज स्वतः पहिले दूर करून आपल्या परिचितांना देखील त्यांच्या मनात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांना मदत करावी आणि पाच वर्षाखालील सर्व बालकांना लसीकरणासाठी आपल्या परिचितांना प्रवृत्त करावे.

केवळ लसीकरण पुरेसे आहे का?
केवळ लसीकरण करणे हा पोलिओ उच्चाटनाचा अंतिम पर्याय नसून एकंदरीतच सार्वजनिक आरोग्याची स्थिती सुधारणे अत्यावश्यक आहे. स्वच्छतेच्या मूलभूत समस्या सोडवणे ही काळाची गरज आहे. एका अनुमानानुसार पोलिओच्या समूळ उच्चाटन नंतर जगातील साधारण 40 ते 50 बिलियन अमेरिकन डॉलर वाचतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगातील कुठलाही व्यक्ती या कायमच्या अपंग करणाऱ्या या भयानक आजारापासून स्वतःचे रक्षण करील. आपल्या पाल्यांना पल्स पोलिओ लसीकरण दरम्यान लस देणे हे पालकांचे आद्य कर्तव्य आहे आणि बालकांचा तो नैतिक अधिकार देखील आहे.