23 February 2019

News Flash

Porsche ची सर्वात महागडी ‘सुपरकार’ भारतात लॉन्च, स्पीड आणि किंमत ऐकून व्हाल हैराण

पोर्शेने भारतात बहुप्रतिक्षित 911 GT2 RS सुपरकार लॉन्च केली आहे

स्पोर्ट्स कारची आवड असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. जर्मनीची कार कंपनी पोर्शेने भारतात बहुप्रतिक्षित 911 GT2 RS सुपरकार लॉन्च केली आहे. Porsche 911 GT2 RS ही हाय परफॉर्मन्स असलेली स्पोर्ट्स कार आहे. Porsche ची भारतीय बाजारातील ही आतापर्यंतची सर्वात महागडी कार आहे.

भारतात या कारची (एक्स-शोरूम मुंबई) किंमत 3.88 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. GT2 RS चा टॉप स्पीड 340 किलोमीटर प्रतितास आहे. अवघ्या 2.8 सेकंदात ही गाडी 0-100Kmph चा वेग पकडते. GT2-RS मध्ये 3.8 लीटर बाय-टर्बो इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन 700 bhp ची पावर आणि 750Nm टॉर्क जनरेट करतं. या इंजिनसह ट्रन्समिशनसाठी 7-स्पीड ड्युअल कल्च गिअरबॉक्स देण्यात आले आहेत.

या कारमध्ये पोर्शे स्टॅबेलिटी मॅनेजमेंट देण्यात आलं आहे, याद्वारे गाडी स्थिर राहण्यास मदत होते. याशिवाय कारमध्ये कार्बन सेरेमिक ब्रेक देण्यात आले आहेत. कारचं वजन कमी असावं यासाठी हूड, फ्रंट व्हिल, मिरर कॅप, रिअर एअर इंटेक्स आणि व्हिल आर्चला कार्बन फायबर प्लास्टिकचा वापर करुन बनवण्यात आलं आहे.

First Published on July 11, 2018 9:50 am

Web Title: porsche launches its most expensive sports car 911 gt2 rs