04 December 2020

News Flash

पैसे दुप्पट करायचेत? Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक

'या' स्कीममध्ये पैसे होतात दुप्पट; सरकारची हमी

Post Office Kisan Vikas Patra Scheme : पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या स्कीम ऑफर करत आहे. कोणत्याही जोखमीशिवाय गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसच्या (Post Office) किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme )या योजनेमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. पोस्ट ऑफिसच्या योजना सरकारद्वारा चालवल्या जातात, त्यामुळे मेहनतीचे तुमचे पैसे बुडण्याची कोणतीही भिती राहात नाही.

किसान विकास पत्र या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारास त्याच्या मॅच्युरिटीनंतर जमा केलेली रक्कम दुप्पट मिळते. या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना रक्कम दुप्पट होण्याची पुर्णपणे हमी दिली जाते. योजनेच्या अटींबद्दल बोलायचं झाल्यास, कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करु शकतो. गुंतवणुकीसाठी कमीतकमी १००० रुपये आणि आधिकची कोणतीही मर्यादा नाही नाही. पण ही गुंतवणूक एकरकमी असावी.

सध्या परिस्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १२४ महिन्यात (म्हणजेच १० वर्षानंतर) पैसे दुप्पट होण्याची हमी पोस्ट ऑफिसकडून देण्यात येत आहे. पैसे किती दिवसांमध्ये दुप्पट होऊ शकतात ते व्याजदरावर अवलंबून आहे. सरकारने २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत या योजनेचा व्याजदर ६.९ टक्के ठरवला आहे.

किसान विकास पत्र या योजनेअंतर्गत १००० रुपये, ५००० रुपये, १०, ००० रुपये आणि ५०, ००० रुपयापर्यंतचे सर्टिफिकेट जारी करण्यात आले आहेत. १८ वर्षा पूर्ण असलेलाच या योजनेमध्ये गुंतवणूक करु शकतो. त्याशिवाय… सिंगल आणि ज्वॉइंट खातेधारकांनाही या सुविधेचा लाभ मिळत आहे. महत्वाचं म्हणजे, मॅच्योरिटीवर गुंतवणुकाधारकाडून पोस्ट ऑफिस टॅक्सच्या स्वरुपात एक रुपयाही घेत नाही. समजा किसान विकास पत्र या योजनेअंतर्गत तुम्ही सध्या दहा लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास १२४ महिन्यानंतर (१० वर्षानंतर) तुम्हाला दुप्पट रक्कम म्हणजे २० लाख रुपये मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 9:47 am

Web Title: post office kisan vikas patra scheme for double benefit nck 90
Next Stories
1 अर्णब गोस्वामी अटक : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या
2 US Election : समजून घ्या काय आहे EARLY BALLOTS CAST सिस्टम
3 VIDEO: नौदलाचे एलिट कमांडोज मार्कोस लडाखमध्ये, चीनला पाण्याखालून हल्ल्याची भीती
Just Now!
X