जर तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं आहे आणि तुम्ही आताही मॅग्नेटिक स्ट्राइप असलेलं एटीएम कार्ड असेल तर आजच तुम्हाला महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागणार आहे. १ फेब्रुवारीपासून मॅग्नेटिक स्ट्राइप असलेलं एटीएम कार्ड काम करणार नाही. त्यामुळे खातेधारकांना आजच ‘ईएमव्ही चिप’ असलेल्या कार्डसाठी अर्ज करावा लागणार आहे. यासोबतच ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांकही अपडेट करण्याचं आवाहन पोस्ट खात्याकडून करण्यात आलं आहे.

यासंदर्भात काही दिवसांपूर्वी पोस्ट खात्याकडून एक अधिसुचना जारी करण्यात आली होती. ३१ जानेवारीपर्यंत जे ग्राहक आपलं जुनं एटीएम कार्ड बदलणार नाहीत त्यांचं जुनं कार्ड १ फेब्रुवारीपासून ब्लॉक करण्यात येईल, असं यामध्ये नमूद करण्यात आलं होतं. मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठी तसंच आपलं एटीएम कार्ड बदलण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या होम ब्रांचमध्ये जावं लागणार आहे.

३१ जानेवारी २०२० पूर्वी ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक आणि आपलं जुनं एटीएम कार्ड अधिक सुरक्षित असलेल्या ईएमव्हि चिप असलेल्या कार्डासह बदलून घ्यावं. यासाठी ग्राहकांनी आपल्या होम ब्रांचशी संपर्क साधावा. १ फेब्रुवारी पूर्वी हे कार्ड न बदलल्यास जुनं कार्ड ब्लॉक करण्यात येईल, असं पोस्ट खात्याकडून सांगण्यात आलं होतं.