News Flash

सायनसपासून बचाव करण्यासाठी करा ‘या’ गोष्टी

घरगुती उपाय ठरु शकतात फायद्याचे

सायनसवर उपयुक्त घरगुती पदार्थ

आरोग्याशी निगडित सर्व गोष्टींची योग्य ती काळजी घेऊनही काही वेळा आपण आजारांपासून स्वतःची सुटका करु शकत नाही. मग आपण या साऱ्याचे खापर बदललेले हवामान, वाढते प्रदूषण आणि आपण मागच्या काही दिवसांत ज्याठिकाणी बाहेर खाल्ले त्या व्यावसायिकाला देतो. सर्दी आणि कफ या समस्या अशा आहेत ज्या आपल्याला वर्षातून किमान एकदा तरी त्रास देतातच. एखादवेळी दुखणाऱ्या घशावर आणि सर्दीवर उपचार करणे सोपे आहे पण सायनसचा त्रास आपले जगणे हैराण करणारा असतो. ही डोकेदुखी इतकी भयानक असते की त्यामुळे काहीच सुचत नाही.

कोणताही त्रास झाला की औषधे घेणे आलेच. पण या औषधांचाही ठराविक काळानंतर कंटाळा यायला लागतो. मग कधी डोस टाळण्यासारखे प्रकार केले जातात. मात्र असे न करता योग्य ती औषधे योग्यवेळी घ्यायलाच हवीत. याबरोबरच जर काही घरगुती उपायांचा अवलंब केला तर त्याचा समस्या दूर होण्यास निश्चितच फायदा होऊ शकतो. पाहूयात काय आहेत सायनसवरील घरगुती उपाय…

१. लिंबू आणि मध

मध हा नैसर्गिक जंतुनाशकाचे काम करतो तसेच त्यामध्ये क जीवनसत्त्व असते. या दोन्हीची सायनसचा त्रास कमी होण्यास मदत होते. तसेच कोमट पाण्यात लिंबाचा रस घेतल्यास सायनसच्या त्रासापासून सुटका होण्यास मदत होते. दिवसातून दोनवेळा लिंबूपाणी घेतल्यास सायनस बरा होण्यास मदत होते.

२. लसूण

लसूण आरोग्यासाठी लाभदायक असतो. त्यामुळे दिवसभरात एकदा तरी आहारात लसणाचा समावेश असणे गरजेचे आहे. लसणामुळे जीवाणू आणि विषाणूंचा नायनाट होत असल्याने सायनससारख्या आजारात तो अतिशय उपयुक्त ठरतो. एक पूर्ण लसूण बारीक करुन ती पेस्ट गरम पाण्यात टाकावी. त्याची वाफ घेतल्यानेही सायनसचा त्रास कमी होण्यास मदत होते.

३. हळद

आयुर्वेदात हळदीचे अनेक फायदे सांगितले आहेत. हळदीमध्ये केवळ अॅंटीऑक्सिडंटस असतात असे नाही तर यामध्ये क्युरक्यूमिन नावाचा घटक असतो जो सायनसच्या त्रासावर उपयुक्त ठरतो. आहारात हळदीचा समावेश असतोच पण त्याशिवाय गरम पाण्यामध्ये चमचाभर हळद घालून दिवसातून तीन वेळा हे पाणी प्यावे.

४. आलं

स्वयंपाकघरात नियमित वापरला जाणारा हा एक पदार्थ आहे. विविध भाज्यांमध्ये तसेच चहामध्ये वापरला जाणारा हा एक ऑलराऊंडर पदार्थ आहे. सायनलसमुळे होणाऱ्या डोकेदुखीवरही आल्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. आल्याचे तुकडे गरम पाण्यात घालून हे पाणी १० मिनीट ठेऊन द्यावे. त्यानंतर ते प्यावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 4:43 pm

Web Title: powerful home remedies for sinus infection easy tips
Next Stories
1 एकाचवेळी फोनच्या दोन्ही बाजूने करता येणार शूटिंग
2 ‘ओप्पो’, ‘शिओमी’, ‘जिओनी’  कंपनीचा मोबाईल वापरताय? सावधान! 
3 ‘Panasonic Eluga I2 Active’ लाँच, किंमत *, *९०/-
Just Now!
X