डॉ. सपना चौधरी-जैन

बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्मच असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे या काळात स्त्रियांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. त्यातच अनेक स्त्रियांना उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास असतो. त्यामुळे ज्या महिलांमध्ये ही समस्या आहे, त्यांनी गरोदरपणात आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तसंच गर्भधारणेदरम्यान रक्तदाबाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
ज्या स्त्रियांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तदाब कमी करण्यासाठी औषधं सुरू करणं, वैद्यकीय चाचण्या, बाळाच्या हालचाली, सोनोग्राफी आणि डॉपलरच्या माध्यमातून माता आणि गर्भाशयातील बाळावर देखरेख ठेवणंही गरजेचं असतं. कारण उच्च रक्तदाब हा आईसोबतच बाळासाठीही हानीकारक आहे. या समस्येला प्रेग्नंसी इन्ड्युस हायपरटेन्शन (पीआयएच) असं म्हटलं जातं.

swollen feet during pregnancy when should you worry
गरोदरपणात पाय का सुजतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
dhule srpf marathi news,
धुळे: गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक ताब्यात
Mugdha Vaishampayan congrats to Kartiki Gaikwad after pregnancy announcement
कार्तिकी गायकवाडने आनंदाची बातमी देताच मुग्धा वैशंपायन झाली भावुक, म्हणाली, “खूप…”

ज्यांना प्रेग्नंसी इन्ड्युस हायपरटेन्शन ही समस्या असते अशा स्त्रियांना उच्च रक्तदाब प्रीक्लेम्पसिया सारखा आजार बळावू शकतो. ही मुळातच एक गर्भधारणा व्याधी आहे. ज्यामध्ये उच्च रक्तदाबाची सुरूवात आणि मूत्रामध्ये लक्षणीय प्रथिने आढळून येतात. प्रीक्लॅम्पसियाला कधीकधी विषबाधा म्हणूनही संबोधले जाते. जर स्थिती अधिक बिघडली तर गर्भवती स्त्रिया आणि त्यांच्या बाळांना हानिकारक ठरु शकते. त्यासाठी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रीक्लॅम्पसिया हा विकार पटकन लक्षात येत नाही. मात्र त्याची काही लक्षणं आहेत. ही लक्षणं गर्भवती स्त्रियांमध्ये जाणवल्यास त्यांनी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्रीक्लॅम्पसियाची लक्षणे:
१. तीव्र डोकेदुखी
२. अंधुक दिसणे
३. ओटीपोटातील दुखणे
४. मळमळ किंवा उलट्या
५. रक्तातील प्लेटलेट्सचा स्तर कमी होणे(थ्रंबोसायटोनिया)
६.यकृताचे कार्य कमकुवत होणे
७. धाप लागणे
८. अचानक वजन वाढणे आणि सूज

अशी घ्या काळजी
१. अधिक आराम करा
२. जास्त ताण घेऊ नका
३. योग्य आहार घ्या
४. वेळोवेळी डॉक्टारांकडून शारीरिक तपासणी करा.
५. डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व चाचण्या योग्य पद्धतीने करा.

(डॉ. सपना चौधरी-जैन या खारघर येथील मदरहुड हॉस्पीटलमध्ये स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ आहेत.)