विशिष्ट हंगामात येणाऱ्या तापावरील लसीकरण झालेल्या महिलांच्या तुलनेत लसीकरण न झालेल्या महिलांमध्ये प्रसूतीपूर्वीच मूल मृत होण्याचा धोका हा ५० टक्क्यांहून अधिक असल्याचे नवसंशोधनातून दिसून आले आहे.

वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील आरोग्य विभागाने २०१२ आणि २०१३ च्या दरम्यान सदर्न हॅम्पशीयरमधील संक्रमक रोगांमुळे येणारा तापाच्या साथीवेळी प्रसूती झालेल्या जवळपास ६० हजार मातांच्या संकलित माहितीचे सर्वेक्षण केले. यावेळी एप्रिल २०१२ ते डिसेंबर २०१३ दरम्यान प्रसूती झालेल्या ५८ हजार ८ मातांच्या माहितीच्या आधारावर संशोधकांना लस न टोचण्यात आलेल्या  ५२ हजार ९३२ मातांमध्ये प्रसूतीपूर्वीच मूल मृत होण्याचे प्रमाण हे ५१ टक्के असून लसीकरण न झालेल्या ५ हजार ७६ महिलांमध्ये प्रसूती मूल मृत होण्याचे प्रमाण हे किंचित कमी असल्याचे दिसून आले. तर प्रसूती होण्यापूर्वीच मूल मृत होण्याचे प्रमाण रोगसंक्रमक तापाच्या दरम्यान वाढले असून ताप येण्याच्या पूर्वार्धात मात्र हे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले.

नॉर्दर्न हॅम्पशीअरमध्ये प्रसूतीपूर्वीच मूल मृत होण्याचे नोंदविण्यात आलेले हे निष्कर्ष आणि ए / एच१एन१ या संक्रमिक आजारांच्या कालावधीत प्रसूतीपूर्वी मूल मृत होण्याची २००० साली स्वित्र्झलडमध्ये नोंदविण्यात आलेली आकडेवारीत देखील वाढ झाल्याचे संशोधकांना आढळून आले.

संशोधनातील निष्कर्ष हे दिसून आले, तेव्हापासून हिवाळी मोसमात येणाऱ्या हंगामी आजारांबाबत दाखविण्यात येणारी काळजी नक्कीच उत्साहवर्धक आहे. तसेच लसीकरणानंतर मिळणाऱ्या लाभांपासून गर्भधारणा करणाऱ्या ४० टक्के महिला या वंचित राहत असल्यामुळे याबाबतची जनजागृती करताना जास्तीत जास्त गर्भवती महिलांनी लसीकरण करावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे पश्चिम ऑस्ट्रेलियातील आरोग्य विभागाच्या अ‍ॅनेटे रेजन यांनी म्हटले आहे.

हे संशोधन वैद्यकीय संसर्ग आजार या जनरलमधून प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)