वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी वर्षभर तुम्ही किती पैसे घालवता याचा अंदाज आहे का तुम्हाला? नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि इतर बरेच ओटीटी प्लॅटफॉर्मस दरवर्षी उत्तम कॉनटेंट सादर करत असतात. जर तुम्ही प्राइम, नेटफ्लिक्स, डिझनी + हॉटस्टार आणि या सारख्या इतर सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मसच सबस्क्रिप्शन विकत घेतली असेल तर तुम्ही दरवर्षी सुमारे १०,००० रुपये खर्च करता. पण तुम्ही यासाठी प्रीपेड योजना घेऊन प्राइम, नेटफ्लिक्स आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मसच विनामूल्य सबस्क्रिप्शन घेऊ शकता. काही ठराविक रिचार्ज प्लॅनसह हे कसं शक्य आहे ते जाणून घेऊयात.

अॅमेझॉन प्राइमच विनामूल्य सबस्क्रिप्शन

जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुम्हाला अॅमेझॉन प्राइमला विनामूल्य सबस्क्रिप्शनची मिळू शकेल. यासाठी तुम्ही २९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅनचा रिचार्ज करू शकता. या प्लॅनमध्ये ३० जीबी डेटा ३० दिवसांच्या वैधतेसोबत येतो. तसेच अमर्यादित कॉलिंगसह रोजचे १०० एसएमएसही मिळतात. एअरटेलची आणखी एक प्लॅन आहे ज्याची किंमत ३४९ रुपये आहे आणि यात अॅमेझॉन प्राइमची सबस्क्रिप्शन मिळते. या प्रीपेड प्लॅनमध्ये  अमर्यादित कॉलिंगसह प्रति दिन 2 जीबी डेटा आणि दिवसासाठी १००  एसएमएस आहेत. जर तुम्ही पोस्टपेड वापरकर्ते असाल तर ४९९  रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीच्या प्लॅनवर एका वर्षासाठी विनामूल्य अॅमेझॉन प्राइमच सबस्क्रिप्शन घेऊ शकता.

नेटफ्लिक्सच विनामूल्य सबस्क्रिप्शन

नेटफ्लिक्स महागड्या सबस्क्रिप्शन प्लॅनसह येत आहे म्हणून व्होडाफोन व्यतिरिक्त कोणताही टेलिकॉम ऑपरेटर याच विनामूल्य सबस्क्रिप्शन देत नाही. तरीही  व्होडाफोनच विनामूल्य सबस्क्रिप्शन केवळ पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी वैध आहे. व्होडाफोन एक वर्ष विनामूल्य नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम तसेच RedX limited edition च  १०९९ या पोस्ट पेड प्लॅनमध्ये ऑफर देते. त्यामुळे तुम्हाला दोन्ही प्लॅन एकाच पॅकमध्ये अमर्यादित डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज विनामूल्य एसएमएस मिळतील. हा प्लॅनमुळे तुम्हाला  नेटफ्लिक्स, अॅमेझॉन आणि इंटरनेट डेटावर स्वतंत्रपणे खर्च करावा लागणार नाही.