सध्या बरेचजण मुरमांच्या त्रासामुळे ग्रासलेले दिसतात. कितीही सौंदर्यप्रसाधन वापरली तरी काहीवेळा या मुरमांवर काहीच परिणाम होत नाही. पण, तुम्हाला माहित आहे का, या महागड्या प्रसाधनांपेक्षा तुमच्या घरातील वस्तूच तुम्हाला या मुरांपासून सुटकारा मिळवण्यास मदत करु शकतात. जेवणात वापरला जाणारा चविष्ट आणि पाचक टोमॅटो हे एक उत्तम सौंदर्यप्रसाधन आहे. टोमॅटोचा गर चेहर्‍यावर भरपूर प्रमाणात लावावा. एक तास तो तसाच ठेवून नंतर तो कोमट पाण्याने धुवून काढावा. असे रोज केल्याने त्वचा गोरी होते आणि चेहर्‍यावरची मुरुम जातात. टोमॅटो व नारळपाण्यात आले किंवा लिंबाचा रस अर्धा चमचा टाकून घेतल्याने चेह-यावर झालेल्या गाठी नाहीशा होतात. कोमट पाण्यात लिंबाचा रस, तुळशीची पाने, गहू व ज्वारीचा रस गाठींवर औषधासारखे काम करतो.
टोमॅटो हे असे फळ आहे जे घरात सहजरीत्या प्राप्त होते. टोमॅटो फार गुणकारी असून त्याचे अनेक उपयोग आहेत.