News Flash

स्वस्त झाला Nokia चा पाच कॅमेऱ्यांचा जबरदस्त स्मार्टफोन, किंमत 15 हजारांपेक्षा कमी

22 तासांपर्यंत टॉक टाइम आणि 18 तास स्टँडबाय टाइम बॅकअप

नोकियाचे स्मार्टफोन बनविणाऱ्या एचएमडी ग्लोबलने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात Nokia 5.3 हा स्मार्टफोन लाँच केला होता. आता कंपनीने या शानदार स्मार्टफोनच्या किंमतीत एक हजार रुपयांची कपात केली आहे. यामध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर, क्वॉड रिअर कॅमेरा आणि 4,000mAh ची बॅटरी यांसारखे फिचर्स आहेत. याशिवाय सेल्फीसाठी नॉच कॅमेरा मिळेल.

Nokia 5.3 स्पेसिफिकेशन्स :-
हा फोन अँड्रॉइड 10 वर कार्यरत असून यामध्ये क्वॉलकॉम ऑक्टाकोर स्नॅपड्रैगन 665 प्रोसेसर आहे. नोकियाच्या या फोनमध्ये 6.55 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. फोनमध्ये चार रिअर कॅमेरे आहेत. यात 13 मेगापिक्सेल, 5 मेगापिक्सेल, 2 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यांचा समावेश आहे. Nokia 5.3 फोनमध्ये 64 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल, शिवाय मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, एफएम रेडिओ, युएसबी टाइप सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे. तसेच, फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4000mAh क्षमतेची बॅटरीही आहे. ही बॅटरी 22 तासांपर्यंत टॉक टाइम आणि 18 तास स्टँडबाय टाइम देते असा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय यात रिअर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि गुगल असिस्टंटसाठी डेडिकेडेट बटण दिलं आहे.

आणखी वाचा- Xiaomi Mi 10i भारतात झाला लाँच, मिळेल तब्बल 108MP कॅमेरा; जाणून घ्या डिटेल्स

Nokia 5.3 किंमत :-
किंमतीत 1 हजार रुपयांची कपात झाल्याने Nokia 5.3 च्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 12 हजार 999 रुपये आणि 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14 हजार 499 रुपये झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 2:55 pm

Web Title: price cut of nokia mid range smartphone nokia 5 3 check new price and specifications sas 89
Next Stories
1 Xiaomi Mi 10i भारतात झाला लाँच, मिळेल तब्बल 108MP कॅमेरा; जाणून घ्या डिटेल्स
2 फ्लिपकार्टवर सुरू झाला Realme Days Sale, या स्मार्टफोनच्या खरेदीवर होईल 10 हजारांची बचत
3 धक्कादायक! तब्बल 10 कोटी भारतीयांचा चोरीला गेलेला क्रेडिट-डेबिट कार्ड डेटा इंटरनेटवर विक्रीला
Just Now!
X