News Flash

Oppo A7 च्या किंमतीत कपात, ‘ही’ आहे नवी किंमत

वॉटरड्रॉप नॉच, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि 4,230mAh क्षमतेची पावरफुल बॅटरी

ओप्पो कंपनीच्या Oppo A7 या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. या फोनचं टॉप व्हेरिअंट अर्थात 4GB रॅम असलेल्या व्हेरिअंटच्या किंमतीत एक हजार रुपयांची कपात करण्यात आली असून या व्हेरिअंटची किंमत आता 12 हजार 990 रुपये झालीये.

Oppo A7 हा स्मार्टफोन लाँच केला त्यावेळी कंपनीने टॉप व्हेरिअंटची किंमत 16 हजार 990 इतकी ठेवली होती, पण त्यानंतर दोन वेळेस याच्या किंमतीत कपात केली, आणि आता पुन्हा एकदा हा फोन एक हजार रुपयांनी स्वस्त झालाय. हा स्मार्टफोन कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि 4,230mAh बॅटरी देण्यात आली आहे. 4GB रॅम  व्यतिरिक्त हा स्मार्टफोन 3GB रॅम व्हेरिअंटमध्येही उपलब्ध आहे.

ओप्पो ए७ ची वैशिष्ट्ये –
अॅड्रॉइड ८.१ ओरिओ बेस्ड कलर ओस ५.२ प्रणाली
४२३० मेगावॅटची बॅटरी
ड्युअल सिम सपोर्ट
फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा
एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल प्रायमरी व र मेगापिक्सल सेकंडरी डेप्थ सेंसर
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ ४.२, जीपीएस, वायफाय
३.५ एमएम ऑडिओ जॅक
मायक्रो युएसबी पोर्ट
मागील बाजूस फिंगरप्रिंट सेंसर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2019 4:34 pm

Web Title: price cut of oppo a7 know all specifications and new price sas 89
Next Stories
1 ‘ई-सिगारेट नि:संशय हानीकारक’
2 ‘मोटोरोला’चा बजेट स्मार्टफोन Moto E6, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
3 ‘सॅमसंग’ला टाकलं मागे, ‘ही’ कंपनी ठरली अव्वल
Just Now!
X