News Flash

सॅमसंगच्या ‘या’ शानदार स्मार्टफोनच्या किंमतीत 25 हजारांची कपात

नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच मोबाइल निर्मात्या कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू

नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच मोबाइल निर्मात्या कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शाओमीनंतर आता सॅमसंग कंपनीनेही आपल्या 4 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केलीये.

सॅमसंगने त्यांचा लोकप्रिय स्मार्टफोन Samsung Galaxy Note 8 च्या किंमतीत 13 हजारांची कपात केली आहे. यापूर्वी ऑगस्ट 20018 मध्येही या स्मार्टफोनच्या किंमतीत 12 हजार रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे एकूण 25 हजार रुपयांच्या कपातीसह हा फोन आता 42 हजार 990 रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवर फोन खरेदी करता येईल. ऑनलाइन खरेदी करण्यासाठी सॅमसंगच्या अधिकृत संकेतस्थळावर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असून याठिकाणी पेटीएमद्वारे खरेदी केल्यास 1 हजार रुपयांच्या कॅशबॅकची ऑफर आणि इएमआयचा पर्यायही आहे.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स –
अँड्रॉइड 7.1.1 न्यूगटवर कार्यरत असणाऱ्या या स्मार्टफोनला 6.3 इंचाचा क्वाडएचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले असून एक्नीनॉक्स 8895 प्रोसेसर आहे. ड्युअल सिम कार्ड स्मार्टफोनमध्ये वापरता येईल. ड्युअल रिअर कॅमेरा (12 मेगापिक्सल रिअर आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा) फोनमध्ये देण्यात आलाय. 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनची मेमरी 256 जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा आहे. 3300 एमएएच क्षमतेची बॅटरी असलेला हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक, मॅपल गोल्ड आणि ऑर्चिड ग्रे अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तसंच यामध्ये व्हीओएलटीई, ड्युअल बँड, वायफाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सी सारखे अन्य फीचर्सही देण्यात आलेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 11:22 am

Web Title: price cut of samsung galaxy note 8
Next Stories
1 Makar Sankranti 2019 : मकर संक्रांती म्हणजे काय ?
2 Makar Sankranti 2019 : तीळ-गुळाची तेलची
3 Makar Sankranti 2019 : आज तयार करा भोगीची स्पेशल भाजी, वाचा रेसिपी…
Just Now!
X