25 September 2020

News Flash

Vivo V15 च्या किंमतीत घट, जाणून घ्या नवी किंमत

ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा

ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला Vivo V15 हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ असू शकते. कारण या स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली आहे.

स्मार्टफोन बनवणाऱ्या विवो कंपनीने भारतात गेल्या महिन्यातच Vivo V15 हा स्मार्टफोन लाँच केला होता. हा स्मार्टफोन म्हणजे Vivo V15 Pro स्मार्टफोनचं ‘ट्रिम डाउन व्हर्जन’ होय. लाँच करतेवेळी 23,990 इतकी या स्मार्टफोनची किंमत ठेवण्यात आली होती, आता यामध्ये 2 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. परिणामी, हा स्मार्टफोन 21 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

पॉप-अप कॅमेरा –
या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा डिस्प्लेच्या मागे लपलेला आहे आणि सेल्फीसाठी क्लिक केल्यानंतर कॅमेरा आपोआप पॉप-अप होतो. हा स्मार्टफोन टोपॉज ब्ल्यू आणि ग्लॅमर रेड कलरमध्ये उपलब्ध असेल, तसंच याच्या वरील बाजूला ग्रेडिअंट फिनिशींग आहे.

फीचर्स – 

– Vivo V15 मध्ये MediaTek Helio P70 SoC प्रोसेसर देण्यात आलं आहे. तसंच फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलं आहे.

-डिस्प्ले – 6.53 इंच आकारमानाचा अल्ट्रा फुल-व्ह्यू डिस्प्ले व 19:5:9 असा अस्पेक्ट रेशो
-रॅम – रॅम ६ जीबी व इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून, मायक्रो-एसडी कार्डद्वारे ५६ जीबीपर्यंत स्टोरेज वाढविण्याची सुविधा
-कॅमेरा – याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असून यामध्ये 12, 8 आणि 5 मेगापिक्सल्सच्या तीन कॅमेर्‍यांचा समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये पॉप-अप या प्रकारातील 32 मेगापिक्सल्सचा कॅमेरा
-बॅटरी – 4,000 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 3:45 pm

Web Title: price cut of vivo v15 smartphone
Next Stories
1 फीचर फोनच्या मार्केटमध्ये Jio अव्वल, सॅमसंग दुसऱ्या स्थानी
2 Xiaomi ने लाँच केला LED स्मार्ट बल्ब, 11 वर्ष खराब न होण्याचा दावा
3 Ducati ने भारतात लाँच केली Scrambler बाइकची नवी आवृत्ती, किंमत किती?
Just Now!
X