News Flash

Oppo F11 Pro झाला स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

पॉप सेल्फी कॅमेरा आणि प्रायमरी रिअर कॅमेरा तब्बल 48 मेगापिक्सलचा

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आपल्या F11 Pro या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. याशिवाय कंपनीचा Oppo A5 हा स्मार्टफोन देखील स्वस्त झाला आहे. दोन्ही फोनच्या 64 जीबी व्हेरिअंटच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.

एफ-11 प्रो च्या 64 जीबी व्हेरिअंट आता दोन हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. किंमतीत कपात झाल्याने एफ-11 प्रो 64 जीबी व्हेरिअंट आता 20 हजार 990 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. आतापर्यंत 22 हजार 990 रुपये इतकी याची किंमत होती. तर या फोनच्या 128 जीबी व्हेरिअंटच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर Oppo A5 च्या 64 जीबी व्हेरिअंटसाठी ग्राहकांना आता एक हजार रुपये कमी म्हणजेच 11 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

F11 प्रो या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे आणि याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचा प्रायमरी रिअर कॅमेरा तब्बल 48 मेगापिक्सल आहे. तर 12 मेगापिक्सलचा सेंकडरी सेंसर कॅमेरा आहे. याचा सेल्फी कॅमेरा पॉप-अप आहे. हा 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असणार आहे. Oppo F11 Pro हा स्मार्टफोन Mediatek Helio P70 प्रोसेसरनुसार चालणार आहे. याची बॅटरी 4,000 mAh आहे. 15 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या फोनचा डिस्प्ले 6.5 इंचांचा एलसीडी आहे. इतर फोनप्रमाणे याला फिंगर प्रिंट सेंसरही देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 12:15 pm

Web Title: price cut oppo f11 pro 64 gb variant
Next Stories
1 Apple ने ‘आयओएस 13’ आवृत्तीची केली घोषणा, जाणून घ्या सर्व फीचर्स
2 OnePlus 7 ची आजपासून विक्री सुरू, जाणून घ्या सर्व ऑफर्स
3 Black Shark 2 : ‘शाओमी’चा गेमिंग स्पेशल स्मार्टफोन खरेदी करण्याची आज संधी
Just Now!
X