टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने आपल्या ग्राहकांना झटका दिला आहे. कंपनीने आपल्या एका पॉप्युलर प्लॅनची किंमत वाढवली आहे. व्होडाफोनच्या ‘प्रीमियम पोस्टपेड’ ग्राहकांमध्ये RedX हा प्लॅन लोकप्रिय आहे. पण, आता कंपनीने या प्लॅनच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ केली आहे.

आतापर्यंत व्होडाफोनच्या प्रीमियम RedX प्लॅनसाठी ग्राहकांना दरमहिन्याला 999 रुपये द्यावे लागत होते. मात्र आता 100 रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांना या प्लॅनसाठी 1,099 रुपये मोजावे लागणार आहेत. किंमत वाढवण्याशिवाय या प्लॅनमधील इतर सेवांमध्ये कंपनीने कोणताही बदल केलेला नाहीये. RedX प्लॅन महाग असला तरी यात मिळणाऱ्या सेवांमुळे हा प्लॅन प्रीमियम पोस्टपेड ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.

किंमत वाढवण्याव्यतिरिक्य या प्लॅनमधील इतर सेवांमध्ये कंपनीने कोणताही बदल केलेला नाहीये. ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय मोफत नॅशनल रोमिंग, दर महिन्याला 100 एसएमएस, काही निवडक देशांमध्ये सवलतीच्या दरात आयएसडी कॉल, आणि राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळांवर लाउंजचा मोफत वापर करण्याची सुविधाही मिळते. याशिवाय नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि Zee 5 या अॅप्सचं सबस्क्रिप्शनही मिळतं. पण, व्होडाफोनच्या या प्लॅनचा एक विचित्र भाग म्हणजे जर एखाद्या ग्राहकाने हा प्लॅन अॅक्टिव्ह केल्याच्या सहा महिन्यांमध्ये नंबर पोर्ट केला किंवा अन्य व्होडाफोनचा प्लॅन घेतला तर ग्राहकाकडे 3,000 रुपये आकारले जातात. 999 रुपयांच्या प्लॅनव्यतिरिक्त अन्य रेड प्लॅनच्या किंमतींमध्ये बदल करण्यात आलेला नाही. ते प्लॅन कंपनीच्या वेबसाइटवर आधीप्रमाणेच 399 रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत.