News Flash

‘बुगाटी’ने लॉन्च केली १३२ कोटी किंमत असणारी ‘ब्लॅक कार’

‘जिनेव्हा मोटर शो २०१९’मध्ये लॉन्च केली नवी कार

'बुगाटी'ची नवी कार

कार प्रेमींमध्ये सध्या चर्चा सुरु आहे ती स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे सुरु असलेल्या ‘जिनेव्हा मोटर शो २०१९’ची. ‘महिंद्रा अॅण्ड महिंद्रा’ने ‘बटिस्टा’ नावाची लक्झरी इलेक्ट्रिक सुपर कारची पहिली झकल काही दिवसापूर्वी या शोच्या माध्यमातूनच दाखवली. याच मोटर शोमध्ये जगप्रसिद्ध ‘बुगाटी’ या वाहन कंपनीने त्यांची एक खास कार लॉन्च केली. या गाडीला ‘ला व्हॉयटूर नोएरी’ हे फ्रेंच नाव देण्यात आले आहे. या नावाचा अर्थ होतो ब्लॅक कार. या गाडीचे एकच मॉडेल तयार करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीचे अध्यक्ष स्टीफन विंकलमॅन यांनी ही गाडी १३२ कोटींना विकण्यात आल्याची माहिती दिली आहे. १३२ कोटींना विकण्यात आलेली ही गाडी आत्तापर्यंतची बुगाटीची सर्वात महागडी गाडी ठरली आहे. मात्र ही गाडी कोणाला विकण्यात आली आहे याबद्दलची माहिती कंपनीने दिली नाही.

गाडीच्या लॉन्चिंग सोहळ्यामध्ये स्टीफन यांनी गाडी आणि ती बनवण्यामागील संकल्पनेसंदर्भात माहिती दिली. ‘बुगाटीचा इतिहास पाहिला तर तो कायमच विशेष प्रोडक्ट देण्याबद्दलचा आहे. बुगाटी आता ला व्हॉयटूर नोएरी सारख्या गाड्यांच्या माध्यमातून भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करत आहे. या गाडीमध्ये वेग, तंत्रज्ञान, लक्झरी आणि सौंदर्याचा अनोखा मिलाफ पहायला मिळणार असून ही गाडी आमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाला दिलेली मानवंदना ठरेल,’ असा विश्वास स्टीफन यांनी व्यक्त केला आहे.

‘या गाडीचा प्रत्येक भाग हा हाताने बनवण्यात आला असून मशीन्सचा कमीत कमी वापर करण्यात आला आहे. कार्बन फायबर बॉडीमुळे या गाडीला चकाकी असणारा काळा रंग शोभून दिसतो,’ असं मत गाडीचा डिझायनर इटियेन सलोमे याने गाडीबद्दल बोलताना व्यक्त केले आहे. आम्ही ही गाडी बनवण्यासाठी बरीच मेहनत घेतली असून आमच्यासाठी ही सर्वात परफेक्ट गाडी असल्याचे समोले यांनी सांगितले. या गाडीमध्ये ८ लिटरचे १६ सिलेंडर असणारे इंजिन आहे. गाडीमध्ये १ हजार ४७९.४७ बीएचपीची आणि १ हजार ६०० एनएम टॉर्कची शक्ती या कारमध्ये आहे.

अशाप्रकारे बुगाटीने याआधी केवळ दोनदा खास गाड्यांचे मॉडेल तयार केले होते. १९३६ आणि १९३८ दरम्यान अशा पद्धतीने तीन खास गाड्या बनवण्यात आल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 3:39 pm

Web Title: priced at rs 132 crore bugatti la voiture noire is the worlds most expensive new car ever made
Next Stories
1 वाय-फाय राउटर घेताय? या गोष्टी जाणून घ्याच
2 Google लहान मुलांना शिकवणार हिंदी-इंग्रजी
3 पोलिओमुक्तीसाठी राज्यात विशेष लसीकरण, ८३ हजार बूथ उभारणार
Just Now!
X