24 April 2018

News Flash

जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचं काय होतंय माहितीये?

पुर्नवापरातून तयार होते ही उपयुक्त वस्तू

सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी अचानक नोटाबंदी जाहीर केली आणि संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला काही वेळासाठी खीळ बसली. नरेंद्र मोदींच्या या अर्थव्यवस्थेतील मोठ्या निर्णयामुळे अनेक गणिते बदलली. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि काळे धन बाहेर येण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे मोदींनी यावेळी स्पष्ट केले होते. नागरिकांनी दिलेल्या वेळेत आपल्याकडील नोटा बँक आणि पोस्टात जमाही केल्या. आता सरकार जमा झालेल्या इतक्या नोटांचे काय कऱणार असा प्रश्न आपल्यातील अनेकांना पडला असेल. तर याचे उत्तर सापडले असून या नोटांचा वापर करुन त्या कागदापासून फाईल आणि फोल्डर तयार करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे तयार करण्याचे काम कारागृहातील कैदी करत आहेत. या नोटांपासून दिवसाला १ हजार फाईल्स तयार करण्यात येत आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्याकडे जमा झालेल्या या नोटा कारागृहाकडे सोपवल्या आहेत. चेन्नईमध्ये पुजहल केंद्रिय कारागृह आहे. याठिकाणी या नोटांच्या लगद्यापासून फाईल्स तयार करण्याचे काम २५ ते ३० जणांची टीम करत आहे. कारागृहात बंदिस्त असलेले कैदी दिवसाला ८ तास काम करतात. साधारणपणे ते महिन्यातील २५ दिवस काम करतात. यामध्ये एका दिवसासाठी त्यांना १६० ते २०० रुपये दैनंदिन वेतन मिळते. नोटांचा लगदा केल्यानंतर तो डायमध्ये टाकला जातो. त्यानंतर तो वाळवून त्यापासून कडक फाईल्स तयार केल्या जातात. आरबीआयने या कारागृहाला आतापर्यंत ७० टन नोटा दिल्या असून त्यातील ९ टन नोटांच्या फाईल आम्हाला मिळाल्या आहेत. आता उरलेल्या नोटांचे काम सुरु असून त्याच्याही फाईल फाईल लवकरच येतील असे कारागृहाच्या अधिक्षकांकडून सांगण्यात आले आहे. या फाईल्स राज्य सरकारच्या विविध विभागांत आणि एजन्सीमध्ये वापरली जाणार असल्याचेही संबंधितांकडून सांगण्यात आले आहे.

 

First Published on January 9, 2018 7:31 pm

Web Title: prisoners making file pads demonetized 500 and 1000 notes
 1. B
  bhinge
  Jan 10, 2018 at 3:01 pm
  प्लायवुड ची लिंक कॉमेंट मध्ये : zeenews dia /personal-finance/demonetisation-old-rs-500-and-rs-1000-notes-used-to-make-plywood_1954724
  Reply
  1. B
   bhinge
   Jan 10, 2018 at 2:59 pm
   नोटा मोजून झाल्या काय? नाही म्हणायला पटेल नोटा अजून मोजल्या नाहीत आणि त्यासाठी नोटा मोजण्याच्या मशीन घेण्यासाठी निविदा मागवल्या आहेत असे संसदीय समितीला काही महिन्यापूर्वी म्हणाले होते. तसेच जमा झालेल्या सर्व नोटांचे प्लायवूड बनवले असे २०१६ मध्येच जाहीर केले होते. आता हे नवीनच सुरु आहे. फाईल चे पुट्ठे बनवणे. नेमके काय चालले आहे हे कोणी सांगेल काय?
   Reply