18 October 2019

News Flash

सायनसच्या आजारावर ‘हे’ आहेत उपाय

चेहऱ्याच्या आणि कवटीच्या हाडात असलेल्या हवेच्या पोकळ्यांनाच 'सायनस' म्हणतात

सायनस म्हणजे काय ?

सायनस म्हणजे कायमानवी कवटी शंखाप्रमाणे पातळ आणि पोकळ हाडाने बनलेली आहे. या पोकळींमध्ये डोळे, कान, नाक अशी संरचना केलेली आढळते. शिवाय या व्यतिरिक्त इतरही काही रिक्त जागा आहेत, ज्याचा संपर्क थेट नाकासोबत होतो. खाली मडक्यात आवाजाचा जसा इको तयार होतो, अगदी तसाच इको या रिक्त जागेत जमा झालेली हवा निर्माण करते, चेहऱ्याच्या आणि कवटीच्या हाडात असलेल्या या हवेच्या पोकळ्यांनाच सायनस असे म्हणतात.

सायन्युसायटिस काय असते ?

सायनसमध्ये सतत एक प्रकारचा पातळ स्त्राव तयार होत असतो, जो नाकातील बारीक खिडक्यांतून बाहेर निघतो. मात्र सायन्युसायटिस प्रक्रियेमध्ये साइनसचे मऊ आवरण सुजते. त्यामुळे नाकातील बारीक खिडक्यांना अडथळा निर्माण झाल्याकारणामुळे ते पाणी सायनसमध्येच साठून राहते, आणि त्यामुळे तिथे जिवाणूसंसर्ग होण्याची शक्यता असते.

सायन्युसायटिसचे होण्यामागचे कारण –

सामान्य सर्दी, सतत नाक बंद राहणं किंवा नाकातील हाड वाढल्यामुळे सायन्युसायटिसचा त्रास होतो.

प्रकार

१. सर्दीमुळे नाक चोंदले असेल, आणि दहा दिवसांतून अधिक दिवस चेहऱ्याचा काही भाग दुखत असेल तर त्याला ‘अक्यूट सायन्युसायटिस’ म्हणतात. ही सर्दी २ ते ४ आठवडा राहते.

२. सब अक्यूटचा त्रास चार ते आठ आठवडा राहतो.

३. आठ आठवड्यांहून अधिक अधिक काळ जो सायनसचा त्रास राहतो त्याला वैद्यकीय भाषेत ‘क्रोनिक सायन्युसायटिस’ असे म्हणतात. यात सकाळी उठल्यावर नाकावाटे की घट्ट पिवळा शेंबूड येतो, त्याला सर्दी पिकली असेही म्हणतात. यात सतत चेहऱ्यावर जडपणा राहतो, ताजेतवाने वाटत नाही, नाक बंद झाल्यासारखे वाटते

४. ज्या सायनसच्या त्रासात वारंवार आणि खूप दिवस टिकणारी सर्दी होते, त्याला ‘रीकरंट सायन्युसायटिस’ म्हणतात. ही सर्दी २-३ महिन्यांनी पुन:पुन्हा होते आणि एकदा सर्दी झाली की ती ८ ते १२ दिवस राहते. या सर्दीची लक्षणेही ‘अक्यूट सायन्युसायटिस’सारखीच असतात.

सामान्य लक्षणे –

-चेहऱ्याचा काही भाग निरंतर दुखत राहणे, अर्धशिशी वाढीस लागून त्या वेदना पूर्ण मस्तकांत भिनभिनते.-

-नाक जाड होणे

-अक्यूट आणि क्रॉनिक सायनासिसिटिसमध्ये नाकातून घट्ट पिवळा किंवा हिरवा द्रव निघणे, तसेच या द्रवांमार्फत रक्त किंवा पू निघणे

-वास कमी

-खोकला आणि कफ

-ताप

-श्वासोश्वासाला त्रास होणे

– थकवा

– दात दुखणे

– डोळ्यांचे विकार

– माथा आणि चेहऱ्याच्या हाडांमध्ये ओस्टियोमॅलायटीसचे संक्रमण

सायन्युसायटिस होण्यामागचे स्रोत –

वारंवार होणारी सर्दी आणि संक्रमणामुळे नाक कोंडणे

-अनुवांशिकरित्या किंवा जंतुसंसर्गामुळे सायनसमधील द्रवाला नाकावाटे बाहेर काढणाऱ्या बारीक खिडक्यांच्या आकारमानात बदल

-नाकातील पॉलिप्स -जन्मतः प्रतिकारशक्ती कमी असणे, किंवा स्टेरॉईड आणि इतर एंटीकेन्सर औषधांचा वापर

-धूम्रपान

-दमा

-नाकामध्ये आणि फुप्फुसांमध्ये म्यूकस द्रव वाजवीपेक्षा अधिक तयार करणारा सिस्टिक फाइब्रोसिस हा -आनुवांशिक विकार

-लहान मुलांमध्ये सामान्यत: एलर्जी, दिवसातील इतर मुलांपासून होणारे संक्रमण तसेच बाहेरील धूळ आणि धूम्रपानरहित वातावरणामुळे

बहुतांश संक्रमणातून सर्दीचा त्रास जडतो, परंतु जिवाणूंच्या संसर्गाची शक्यता असल्यास हवी लक्षणे १० दिवसांहून अधिक काळ टिकतात.

निदान-

सायनसच्या संबंधित असलेल्या समस्या आणि आजारांचा अभ्यास तसेच निरीक्षण करून तसेच त्यावर निगडित असलेल्या भूतकाळातील आजारांचे दाखले विचारात घेऊन, आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक विकसित बदल झाले आहेत. आतापर्यंत  विविध डॉक्टरांमार्फत केलेल्या निरीक्षणाद्वारे सीटी स्कॅन किंवा एक्स-रे च्या माध्यमातून निदान केले जाते. शिवाय नाकातील बारीक पडदे आणि पोकळ्यांसाठी एन्डोस्कोपी प्रक्रिया आवश्यक असल्यास लहान दुर्बिणीद्वारे ही निदान शक्य होऊ शकते.

उपचार –

अँटीबायोटिक्स, अँटीएलर्जिक्स, पेनकीलर्स, ड्रॉप आणि स्प्रे यांच्याद्वारे वैद्यकीय उपचार केले जातात. आवश्यक असल्यास स्टेरॉईड्स आणि इम्यूनोग्लोबुलिनच्या साहाय्याने प्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत होते. मात्र याच प्रमाण किती असाव, हे वैद्यकीय सल्ल्यानुसार घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनाद्वारे औषधे आणि डोस बदलता येतात.

काळजी कशी घ्यावी –

⦁ नाकाला श्वसनाला त्रास होईल किंवा संक्रमण होईल असे खाद्यपदार्थ, डिओ स्प्रे, एअर फ्रेशनर्स आणि इतर गडद सुंगंधी वस्तूंपासून शक्यता तितके दूर राहणे योग्य.

⦁ श्वसनाचा त्रास होत असेल, तर गरम पाण्याची वाफ घ्यावी, जेणेकरून श्वासोच्छवास पुर्वव्रत होण्यास मदत होते⦁ धूम्रपान आणि मद्यपान सेवनाचे प्रमाण कमी करावी

⦁ सायनसमध्ये तयार होणार म्युकस द्रव पातळ करण्यासाठी उबदार सूप आणि द्रव प्या.

⦁ सकाळी किंवा दिवसभरात कधीही १५ मिनिटे स्वतःला व्यायामासाठी वेळ काढा, खोल श्वासोच्छवासाचा व्यायाम करा, नाक आणि सायनसद्वारे हवाई प्रवाह वाढवा.

⦁ ओल्या केसांनी पंखाखाली किंवा एअर कंडिशनरच्या समोर बसणे टाळा.

शस्त्रक्रिया करायचे निदान आल्यासजर वैद्यकीय उपचार वारंवार करूनही अपयश येत असेल तर डॉक्टर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात. नाकातील खिडकीतील अडथळे साइनसमध्ये म्युकसचे प्रमाण वाढीस लागल्यास आणि त्यात जंतूसंसर्ग झाल्यास एंडोस्कोपिकच्या माध्यमातून त्याचे निदान केले जाऊ शकते. एंडोकोस्कोपिकद्वारे नाकातील पोलिप्स आढळतात. आणि त्यानंतर सेप्टोप्लास्टी किंवा बुलून सिनाप्लास्टी नामक नवीन तंत्राद्वारे शस्त्रक्रिया यशस्वी केली जाते. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण दोन ते पाच दिवसांत पुन्हा काम करू शकतात.

शस्त्रक्रिया न केल्यास काय होऊ शकते?

निराकरण समस्येत वाढ होत जाते. सायन्युसायटिसची समस्या क्रोनिक सायटिसचे रूप घेऊ शकते. संक्रमण अधिक वाढीस लागून त्याचे पडसाद मेंदू आणि खोपडीची हाडे यांच्यावर पडू शकतात. डोळ्यांच्या सॉकेटमध्ये व्यत्यय आल्यामुळे पाहण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

First Published on April 16, 2019 12:51 pm

Web Title: problem and solution of sinus