आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या त्रासांमध्ये अॅसिडिटी किंवा आम्लपित्ताचा विकार सामान्य झाला आहे. २० वर्षावरील प्रत्येकालाच अॅसिडिटीचा हा त्रास कधी ना कधी होतोच.

लक्षणे –

Kitchen Jugaad Video
Jugaad Video: पोळीच्या पिठात साबण किसून टाका; स्वयंपाकघरातील ‘या’ मोठ्या समस्येतून होईल सुटका
consuming Brazil nut nuts to help relieve the symptoms of hypothyroidism benefits of nuts help provide some relief
दिवसातून फक्त दोनदा ‘या’ ड्रायफ्रूटचे करा सेवन; थायरॉईड राहील नियंत्रणात? डॉक्टरांनी सांगितला फंडा
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video
Eating walnuts on an empty stomach in the morning
अक्रोड खाताना ‘ही’ योग्य वेळ, पद्धत व प्रमाण पाळल्यास मेंदू होईल तल्लख; तुमच्या शरीरात काय बदलेल?

* छातीत जळजळणे

* पोटात दुखत राहणे

* मळमळणे

* पित्ताच्या आंबट उलट्या होणे

* जेवल्यावर पोट फुगणे

* ढेकरा येणे

* अन्नावर वासना नसणे

सतत धावपळ करणाऱ्या, व्यवसाय-धंद्यात मनावर खूप ताण-तणाव असणाऱ्या, खाण्या-पिण्याच्या वेळा सांभाळणे न जमणाऱ्या व्यक्तींना हा त्रास होत असतो. अन्नपचनासाठी जठरात असलेल्या पाचक रसांमध्ये आहारातील प्रथिनांचे पचन होण्यासाठी हायड्रोक्लोरिक अॅसिड असते. आहारातील काही घटक, खाण्यात आलेले इतर पदार्थ अशा गोष्टींमुळे जठरातील हे अॅसिड गरजेपेक्षा जास्त प्रमाणात स्त्रवून वरच्या बाजूने म्हणजे अन्ननलीकेच्या दिशेने उसळ्या मारते. यामुळे छातीत जळजळ होते. अन्ननलिका आणि जठर यांच्यामध्ये एक झडप असते. अन्ननलिकेतून अन्न जठरात आल्यावर ती बंद होते. मात्र काही व्यक्तींमध्ये ही झडप सैल पडते, त्यामुळे जठरातील अॅसिड सहजरित्या अन्ननलिकेत जाऊन रुग्णाला अॅसिडिटीचा प्रचंड त्रास होतो. याला ‘गॅस्ट्रोइसोफेजीयल रीफ्लक्स डिसीज’ म्हणतात.

दुष्परिणाम-

अॅसिडिटी जास्त प्रमाणात, सतत आणि खूप दिवस होत राहिल्यास रुग्णाला अन्ननलिकेत, जठरात, लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात जखमा होतात, यालाच अल्सर म्हणतात. या रुग्णांना पचनसंस्थेच्या याच भागांचे कर्करोगदेखील होऊ शकतात.

अॅसिडिटी टाळण्यासाठी उपाय –

* उपाशीपोटी राहण्याची सवय टाळा. आजच्या जीवनात पोट रिकामे ठेवून दिवसभर कामात व्यस्त राहणाऱ्या व्यक्तींना हा त्रास खात्रीने होतो.

* जेवणाच्या वेळा ठराविक असाव्यात. दर चार तासांनी थोडे थोडे खावे.

* आहारामध्ये जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे टाळा

* जेवताना हळूहळू आणि प्रत्येक घास चावून खावा.

* घाईगडबडीने जेवल्याने अपचन, अॅसिडिटी असे त्रास होतात.

* जागरणे टाळावीत. किमान साडेसहा ते सात तास झोप घेणे आवश्यक असते.

* दुपारी जेवून लगेच आडवे होण्याने हमखास अॅसिडिटी वाढते. त्यामुळे दुपारची वामकुक्षी टाळावी.

* रात्रीचे जेवण लवकर करावे. जेवणानंतर ३ तासांनी झोपावे. रात्री खूप उशीरा जेवू नये.

* रात्री जेवल्यावर अर्धा तास शतपावली करावी.

* धूम्रपान, तंबाखूसेवन, मद्यप्राशन अशी व्यसने, त्याचप्रमाणे चहा-कॉफी, कोला पेये यांचा अतिरेक टाळावा.

* मानसिक ताण, काळजी यामुळे अॅसिडिटी वाढते, त्याकरिता या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेडीटेशन, रीलॅक्सेशन टेक्निक्स करावे.

* डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ऍस्पिरीन, सांधेदुखीची औषधे, पेनकिलर्स परस्पर घेऊ नयेत.

* चालण्याचा व्यायाम करून वजन आणि विशेषतः पोट कमी करावे.

 

अॅसिडिटी झाल्यावर काय करावे?

* अर्धा ग्लास थंड दूध प्यावे. या दुधामध्ये खाण्याचा सोडा १ चमचा टाकून घेतल्यास अॅसिडिटी त्वरित कमी होते.

* व्हॅनिला आईस्क्रीम किंवा मिल्कशेक घ्यावा.

* अॅसिडिटी झाल्यावर दूधभात, दूध-चपाती किंवा दूध-भाकरी खावी.

* सतत अॅसिडिटी होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासण्या कराव्यात आणि उपचार करावेत.

डॉ. अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन