News Flash

YouTube आणतंय नवं फीचर, आता व्हिडिओसह मिळेल शॉपिंगचा पर्याय!

युजरला व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रोडक्ट्सबाबतची माहिती आणि काही शॉपिंग लिंक्स दाखवल्या जातील...

लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म अ‍ॅप Youtube ने एका नवीन फीचरवर चाचणी घेत असल्याची माहिती दिली आहे. Products in this Video असे या फीचरचे नाव आहे. या अंतर्गत युजरला व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रोडक्ट्सबाबतची माहिती आणि काही शॉपिंग लिंक्स दाखवल्या जातील.

‘9टू5 गुगल’च्या एका रिपोर्टनुसार, सध्या कंपनीने या फीचरसोबत एक छोटासा प्रयोग सुरू केला आहे. यानुसार, युट्यूबवर युजर जो व्हिडिओ बघत असेल त्यामध्ये दाखवलेल्या प्रोडक्टबाबतची माहिती युजरला दाखवली जाईल. त्या प्रोडक्टसाठीची शॉपिंग लिंक व्हिडिओच्या खाली किंवा व्हिडिओवरच दिसेल. सध्या केवळ अमेरिकेच्या काही युजर्ससोबत यावर चाचणी घेतली जात आहे.

यूट्यूबने आपल्या सपोर्ट पेजवर हे फीचर समजावताना एक उदाहरण दिलं आहे. यूट्यूबने Help सेक्शनमध्ये या फीचरची माहिती देताना सांगितलं, की जर ‘एखाद्या व्हिडिओचं शीर्षक Top 10 smartphones in 2020 असे असेल तर, नव्या फीचरद्वारे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या फोन मॉडेल्सबाबतची सर्व माहिती व्हिडिओच्या खाली दाखवली जाईल’. यूट्यूबचं हे नवं फीचर बऱ्याच प्रमाणात ‘शॉपिंग अ‍ॅड’प्रमाणे आहे. त्यामुळे कंपनी व्हिडिओसोबत शॉपिंगचा पर्याय देणारी नवी सेवा सुरू करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण याला अद्याप कंपनीकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 12:14 pm

Web Title: products in this video youtube tests new feature with shopping links sas 89
Next Stories
1 झूम कॉलवरच केलं लग्न; पाहुण्यांना आमंत्रण देताना म्हणाले ‘लग्नाला या, पॅण्ट नसली तरी चालेल’
2 ‘क्वॉड कॅमेरा सेटअप’सह ‘पॉवरफुल’ बॅटरी, Redmi Note 9 झाला लॉन्च
3 Video: १ मे १९६० ला असा साजरा झाला पहिला ‘महाराष्ट्र दिन’; रोषणाई, जल्लोष यात्रा अन् बरचं काही…
Just Now!
X