21 September 2020

News Flash

Made In Jail : कैद्यांनी बनवलेल्या वस्तू आता Amazon आणि Flipkart वर?

'कैद्यांनी बनवलेल्या वस्तू ब्रॅंड म्हणून समोर याव्यात अशी आमची इच्छा'

(सांकेतिक छायाचित्र)

राज्य सरकारच्या कैदी पुनर्वसन योजनेमध्ये आता घरबसल्या केवळ एका क्लिकच्या आधारे तुम्हालाही हातभार लावता येणार आहे. कारण, तुरुंगातील कैद्यांनी बनवलेले फर्निचर, कपडे, कार्पेट, विविध मुर्ती, मिठाई अशा निरनिराळ्या वस्तू लवकरच ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या संकेतस्थळांवर या वस्तू लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होतील.

‘तुरुंगातील काही कैद्यांमध्ये उत्तम कौशल्य आणि कला असते, ते खूप मेहनती असतात. त्यांच्या गुणांना आणि त्यांच्या मेहनतीला वाव मिळावा यासाठी लवकरच त्यांनी तुरूंगात तयार केलेल्या वस्तू अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या संकेतस्थळांवर विक्रीसाठी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) दिपक पांडे यांनी ‘मुंबई मिरर’शी बोलताना दिली. तर , ‘कैद्यांनी बनवलेल्या वस्तू सध्या ठाणे, नागपूर, नाशिक आणि पुणे येथील तुरूंगाच्या परिसरातील दुकानांमध्ये विकल्या जातात. मात्र, त्याला अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. ऑनलाइन विक्री सुरू झाल्यावर या वस्तूंच्या विक्रीमध्ये निश्चितच वाढ होईल. तुरूंगातील प्रत्येक कैद्यांना त्यांची क्षमता वाढवण्याची परवानगी मिळायला हवी, तुरूंगातील वस्तू ब्रॅंड म्हणून समोर याव्यात अशी आमची इच्छा’ आहे, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य जेल कॉर्पोरेशनची स्थापना केली जाणार आहे. कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंची शक्य त्या प्रत्येक ठिकाणी मार्केटिंग करणं आणि विक्री वाढवून उत्पन्न वाढवणं हे या कॉर्पोरेशनचं मुख्य उद्दीष्ट असेल. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये कैद्यांच्या वस्तू ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला गेल्या काही वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात डबल मर्डर प्रकरणाती आरोपी चिंतन उपाध्याय याने रेखाटलेली ‘जखमी झेब्रा’ ही पेंटींग सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरली होती. याशिवाय चिंतनच्या अन्य एका कलाकृतीसाठी एका चित्रपट निर्मात्याने 4.5 लाख रुपयेही मोजले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 12:37 pm

Web Title: products made by jail prisoners will be available on amazon and flipkart
Next Stories
1 जगातील पहिलं 5G सीम कार्ड लाँच !
2 Heroच्या ‘स्प्लेंडर’ला 25 वर्ष पूर्ण , विशेष आवृत्ती लाँच; किंमत…
3 तणावाच्या तपासणीसाठी नवी सोपी चाचणी
Just Now!
X