18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

Happy Promise Day 2017: आजचा दिवस खऱ्या प्राॅमिसचा

शब्दांना महत्त्व आहे!

लोकसत्ता टीम | Updated: February 14, 2017 10:28 AM

Happy Promise day 2017

व्हॅलेंटाईन वीकमधला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे तो प्राॅमिस डे. रोझ,चाॅकलेट आणि टेडी बेअरसारखी गिफ्ट्स आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला दिल्यानंतर आता वेळ आली आहे ती तिच्या किंवा त्याच्या मनात आपल्या प्रेमाची तीव्रता बिंबवून देण्याची.  प्राॅमिस डेच्या दिवशी देण्यात येणारं प्राॅमिस हे काही हवेचे बुडबुडे नसतात. तर या प्राॅमिसेस चं महत्त्व मोठं असतं. तुमच्या रिलेशनशिपचा तो एक मोठा भाग बनणार असतो. म्हणून आज तुम्ही जे बोलणार ते फार महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे शब्द जपून वापरा आणि जे म्हणाल ते कसोशीने पाळायचा प्रयत्न करा.

प्रत्येक रिलेशनशिपमध्ये चढउतार असतात. प्रत्येक रिलेशनशिपची वेगळी अशी काही आव्हानं असतात. ती आव्हानं त्या दोघांनाच माहीत असतात. आजच्या दिवशी केल्या जाणाऱ्या प्राॅमिसेसमधून हीच आव्हानं, असतील तर काही प्राॅब्लेम्स दूर करायची संधी तुम्हाला आहे.

१. मी नेहमी तुझ्यासोबत असेन आणि तुझी कायम साथ देईन.

२.माझ्यावर तुझा विश्वास कायम राहील याची मी कायम काळजी घेईन

३.तुझं मन जिंकायला मी जे जे प्रयत्न केले ते तू माझ्यासोबत -आल्यानंतरही मी करेन.

४.रिलेशनशिपमध्ये एकमेकांना सांभाळून घेणं खूप महत्त्वाच असतं. तुझ्या प्रत्येक बॅडपॅच मध्ये मी तुझ्यासोबत असेन.

५. तुझी माझी रिलेशनशिप ही आपल्या दोघांचीच असेल. त्यात मी अनावश्यक गोष्टींना किंवा लोकांनाही येऊ देणार नाही

६. तू दुखावणार नाहीस याची मी नेहमी काळजी घेईन.

७. मी तुला कधीही एकटं वाटू देणार नाही.

८. रिलेशनशिपमध्ये एकमेकांशी होणारा संवाद महत्त्वाचा असतो. हा संवाद मी कायम राखेन.

९. मी तुझ्याशी नेहमीच प्रामाणिक राहीन

आणि सगळ्यात महत्त्वाचं….

१०. आपल्या या रिलेशनशिपला मी माझ्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान देईन

First Published on February 11, 2017 10:45 am

Web Title: promise day what will you promise to you beloved