डॉ. राहुल पंडित

करोना झालेल्या रुग्णाला रेमडेसिविर हे इंजेक्शन दिले जाते. सध्या रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असून अनेक गंभीर रुग्णांना देण्यासाठी ही लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे रेमडेसिविरचा सरसकट वापर करणे टाळले पाहिजे. ‘रेमडेसिविर’चा योग्य वापर करणे गरजेचे आहे.

‘कोविड-१९’ साथीच्या रोगादरम्यान नियंत्रित धोरणांनंतरही वाढलेल्या प्रादुर्भावाला रिपर्पज्ड औषधेही त्वरित प्रतिसाद देत आहेत. ही औषधे वेळेची बचत करण्यासोबत प्री-क्लिनिकल आणि अर्ली क्लिनिकल चाचणीमध्ये सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. ही औषधे थेट आजाराचा अंतिम टप्पा, म्हणजेच तिसऱ्या टप्प्यामध्ये वापरता येऊ  शकतात आणि कोविड-१९ वर उपचार म्हणून त्यांची सुरक्षितता व कार्यक्षमतेसाठी सुलभपणे त्यांचे मूल्यांकन करता येऊ  शकते. हीच गोष्ट रेमडेसिविरसारख्या औषधांच्या बाबतीत करण्यात आली आहे. मध्यम स्वरूपात कोविड-१९ संसर्ग असलेल्या किंवा हळूहळू स्थिती गंभीर होत असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर देण्यात आले आहे.

रेमडेसिविर कसे काम करते? : विषाणूने मानवी पेशीमध्ये प्रवेश केल्यानंतर पेशी जेनेटिक घटक उत्सर्जित होतात, जे शरीराच्या विद्यमान यंत्रणेचा वापर करून शरीरभर पसरतात. संसर्गाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध मानवी प्रोटीन, विषाणू प्रोटीन आणि त्यांची परस्परक्रिया होत असते. पुनरावृत्तीच्या टप्प्यामध्ये आरडीआरपी नावाचे प्रमुख व्हायरल प्रोटीन विषाणूचा स्रोत बनते. रेमडेसिविर आरडीआरपीवर थेट हल्ला करत काम करते. रेमडेसिविर आवश्यक असलेल्या ‘फिडिंग’ची गरज पूर्ण करते, ज्यामुळे विषाणूचे प्रमाण अधिक वाढण्याला प्रतिबंध होतो.

रेमडेसिविरचा वापर करण्याची योग्य वेळ : सार्स-कोव्ह-२ विषाणूवरील उपचारासाठी यूएसएफडीएने प्रथम रेमडेसिविरला मान्यता दिली. हे औषध कोविड-१९च्या गंभीर व महत्त्वपूर्ण टप्प्यांदरम्यान प्रभावी ठरले. तसेच हे औषध हेपेटोटॉक्सिक असण्यासोबत यकृताच्या पेशींना हानिकारक असल्याचे आढळून आले. व्यावहारिकदृष्टय़ा व्हायरलची पुनरावृत्ती पहिल्या १ ते ७ दिवसांमध्ये समाप्त होते, ७ ते ८ दिवसांनंतर गंभीर कोविड-१९ आजारासंदर्भात दिसण्यात आलेली जटिलता दाहक प्रतिक्रियेमुळे (एसआयआरएस) आहे. म्हणून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजेच व्हायरल पुनरावृत्ती होत असलेल्या दुसऱ्या ते दहाव्या दिवसांदरम्यान या औषधाचा वापर करावा. ज्यामुळे शरीरातील विषाणूचा प्रभाव कमी होईल.

तुम्हाला रेमडेसिविरबाबत माहिती असावी अशी महत्त्वपूर्ण बाब : डब्ल्यूएचओच्या संशोधनानुसार रेमडेसिविर रुग्णांमधील मृत्यूंच्या प्रमाणात प्रतिबंध करत नाही, पण हॉस्पिटलमधील उपचाराचा कालावधी १ ते ३ दिवसांनी कमी झाल्याचे आढळून आले आहे. लक्षण नसलेल्या, सौम्य लक्षणे असलेल्या किंवा गंभीर आजारी असलेल्या आणि मल्टी-ऑर्गन डायस्फंक्शनपासून पीडित असलेल्या रुग्णांमध्ये या औषधाचा वापर करू नये. पण सौम्य ते मध्यम संसर्ग असलेल्या आणि लक्षणे दिसून न येणाऱ्या रुग्णांमध्ये त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी संसर्गाच्या दुसऱ्या व दहाव्या दिवसादरम्यान या औषधाचा वापर करावा. साथीच्या रोगादरम्यान रेमडेसिविरच्या परिणामकारकतेला महत्त्व मिळाले असले तरी या औषधाच्या तुटवडय़ामुळे हेल्थकेअर प्रदाते, पुरवठादार व रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तुटवडय़ामागे अनेक कारणे आहेत. करोना रुग्णांमध्ये वाढ, अनावश्यक स्टॉकपिलिंग आणि गंभीर संसर्ग असलेल्या रुग्णांसाठी औषधांचा वापर. पण दुसऱ्या लाटेचा भयंकर परिणाम दिसून येत असताना सरकारने स्थानिक पातळीवर हे औषध मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी त्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

रेमडेसिविरचा वापर करण्याची योग्य पद्धत : औषधाला अधिक मागणी असली तरी त्याचा योग्य प्रकारे वापर करणे माहीत असलेच पाहिजे. या कोर्समध्ये सामान्यत: पाच दिवसांमध्ये सहा डोस दिले जातात (पहिल्या दिवशी २०० मिलिग्रॅम, त्यानंतर पुढील ४ दिवस १०० मिलिग्रॅम). या औषधाचा अधिक प्रमाणात वापर करू नये. लक्षण नसलेल्या, सौम्य लक्षणे असलेल्या किंवा मल्टिऑर्गन डायस्फंक्शनसह गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना हे औषध दिले जात नाही. हे औषण देण्यापूर्वी रुग्णाची सखोल तपासणी केली जाते. हे औषध संसर्गाच्या १०व्या दिवसानंतर दिले जात नाही.

म्हणजेच आपल्याला समजलेच असले की गरज असलेल्या अनेक रुग्णांना वेळेवर हे औषध मिळत नाही. एक समुदाय म्हणून आपण जबाबदारीने वागलो पाहिजे आणि या औषधाचा योग्य वापर व पुरवठय़ाची काळजी घेतली पाहिजे.

(लेखक मुंबईतील फोर्टिस रुग्णालयाच्या क्रिटिकल केअरचे संचालक आणि राज्याच्या ‘कोविड-१९ कृती दला’चे सदस्य आहेत.)