News Flash

ढेकणांच्या समस्येने त्रस्त आहात? मग करा ‘हे’ घरगुती उपाय

'हे' उपाय करुन पळवा घरात झालेली ढेकणं

घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न ठेवायचं असेल तर घराची स्वच्छता करणं गरजेचं आहे. जर घरात अस्वच्छता आणि पसारा असेल तर सहाजिकच त्या ठिकाणी रोगराई पसरते. इतकंच नाही डास, ढेकूण यांचीही पैदास होते. अनेक वेळा उन्हाळ्यात घरामध्ये, घरांच्या कोपऱ्यात किंवा अंथरुणांवर ढेकूण आढळून येतात. दिसायला अत्यंत लहान असलेले हे ढेकूण प्रचंड जोरात चावतात. त्यामुळे अनेकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो. परंतु, हे ढेकूण होतात कसे आणि त्यांना घालवण्याचे घरगुती उपाय कोणते हे आज आपण जाणून घेऊयात.-

१. ढेकूणांचा नायनाट करण्यासाठी कांद्याचा रस हे अत्यंत फायदेशीर औषध आहे. कांद्याच्या रसाचा वास ढेकूणांना सहन होत नाही त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो आणि ते मरतात. त्यामुळे ढेकूण होत असलेल्या ठिकाणी कांद्याचा रस लावावा.

२. गादी, पांघरुण किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी ढेकूण आढळल्यास त्या ठिकाणी निलगिरीचे थेंब शिंपडा.

३. निलगिरीच्या तेलात रोजमेरी, लव्हेंडर तेल मिक्स करुन हे तेलदेखील ढेकूणांचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी लावू शकता.

४. लव्हेंडरची पाने कपड्यांवर घासल्यास कपड्यांवरील ढेकूण निघून जातात.

५. पुदिन्यांच्या पानांच्या तीव्र वासामुळेही ढेकूण दूर होतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणाशेजारी ताज्या पुदिन्याची पाने ठेवावीत.

६. कडुलिंबामध्ये अॅन्टी मायक्रोबायल गुणधर्म असतात. त्यामुळे किटक यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक वेळा कडुलिंबाच्या पानांचा वापर होतो. जर घरात ढेकूण झाले असतील तर कडुलिंबाच्या तेलाचा शिडकाव घरातील कोपरे, अंथरुण यावर करावा.

७. घरात स्वच्छता ठेवा. घरातील ओलसरपणा टाळा.

८. घरात पुरेपूर सुर्यप्रकाश येईल याची काळजी घ्या.

९. वेळोवेळी पेस्ट कंट्रोल करा.

ढेकूण होण्याची कारणे –

१. कुजलेले लाकूड किंवा ओलसर जागा येथे ढेकणांची पैदास लवकर होते.

२. घरात अस्वच्छता असेल तर लगेच तिथे ढेकूण होतात.

३. घरात पुरेसा सुर्यप्रकाश येत नसेल तर ढेकूण लगेच तिथे होतात.

४. सूर्यप्रकाश नसलेल्या जागी ढेकूण वर्षानुवर्षे राहतो. तसंच तो ६५ दिवस अन्नाशिवाय जगू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 2:05 pm

Web Title: protecting home from bed bugs ssj 93
Next Stories
1 ८३ वर्षे मोफत नेटफ्लिक्स… जाणून घ्या भन्नाट ऑफर
2 डायबेटिसच्या रुग्णांसाठी वरदान आहे मेथी; जाणून घ्या फायदे
3 मध आणि दालचीनीच्या मिश्रणाचं सेवन केल्यास होतील हे फायदे
Just Now!
X