डॉ. रिंकी कपूर
बदलत्या वातावरणाचा आणि चुकीच्या आहारपद्धतीचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर होत असतो. त्यामुळेच अनेक वेळा त्वचाविकार किंवा तत्सम समस्या उद्भवल्याचं पाहायला मिळतं. सध्याच्या काळात अनेक जण सोरायसिस या त्वचाविकाराने त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. या विकारामध्ये रक्तातील पांढऱ्या पेशींपैकी ‘टी’ लिम्फोसाइटमध्ये काही बदल होता. ज्यामुळे त्वचेच्या अस्तरामधील पेशींवर परिणाम होतो आणि त्वचेवर एक जाडसर स्तर निर्माण होतो. या विकारात अनेकदा शरीरावर लालसर चट्टे येणे किंवा खाज सुटणे अशा तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे सोरायसिस असलेल्या व्यक्तींनी त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

अशी घ्या त्वचेची काळजी

१.त्वचा आणि केसांच्या स्वच्छतेकरिता सौम्य उत्पादनांचा वापर करा.

२. त्वचेला नियमित मॉईश्चराईज करा.

३. तीव्र सुर्यप्रकाश तसेच अतिनील किरणांपासून त्वचेचं संरक्षण करा.

४. त्वचा कोरडी पडणार नाही याची काळजी घ्या.

५. त्वचेला हानी पोहोचणार नाही तसेच जखम होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या.

६. सतत खाजवणे टाळा. याकरिता त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्यांने मलम तसेच औषधांचा वापर करा.

७. मध आणि हळद या दोन्ही त्वचेसाठी वापर करा.

८. दिवसातून एकदाच अंघोळ करा. त्याकरिता सौम्य साबणाचा वापर करा.

९. त्वचा घासू नका.

१०. आपल्या सोबत नेहमी मॉईश्चरायझर बाळगा.

११. नारळाच्या तेलामध्ये कोरफडीचा गर मिसळून घरच्या घरी मॉईश्चरायझर बनवू लावा.

(लेखिका डॉ. रिंकी कपूर या द एस्थेटिक क्लिनिक्स’मध्ये डरमॅटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डरमॅटोलॉजिस्ट आहेत.)