PUBG Lite खेळणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कमी क्षमतेच्या सिस्टिमसाठी डिझाइन केलेला PlayersUnknown Battleground (PUBG) गेमचा ‘लाइट व्हर्जन’ गेम PUBG Lite 29 एप्रिलपासून कायमस्वरुपी बंद होणार आहे. जगभरात हा गेम 29 एप्रिलला बंद होईल. गेमच्या डेव्हलपर्सकडून एका पोस्टद्वारे याबाबत माहिती देण्यात आली.
29 एप्रिलपासून पब्जी लाइट कायमस्वरुपी बंद होणार आहे. तर, गेमसाठी प्लेयर्सना मिळणारा सपोर्ट 29 मे रोजी संपेल असं सांगण्यात आलं आहे. गेम बंद होणार असल्याची घोषणा करण्याच्या एक दिवस आधीच कंपनीने PUBG Lite चं वेबपेज lite.pubg.com बंद केलं आहे. अशात ज्यांच्या फोनमध्ये आधीपासून PUBG Lite गेम इंस्टॉल असेल ते थोडे दिवस या गेमची मजा घेऊ शकतील. तर, नव्या युजर्सना हा गेम डाउनलोड करता येणार नाही.
अत्यंत विचार करुन हा गेम बंद करण्याचा कठोर निर्णय घेतल्याचं कंपनीने सांगितलं. गेम बंद होईपर्यंत ज्यांच्या फोनमध्ये गेम इंस्टॉल असेल ते या गेमची पूर्ण मजा घेऊ शकतात. शिवाय उर्वरित दिवसांमध्ये शिल्लक राहिलेल्या L-COIN सह इन-गेम क्रेटिड्सचा वापरही करता येईल असं सांगण्यात आलंय. गेम बंद झाल्यानंतरही पुढील सूचना मिळेपर्यंत PUBG Lite चं फेसबुक पेज सुरू राहणार आहे. कंपनीने L-COIN (पेड कॅश) टॉप-अप सिस्टिम गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बंद केली होती, त्यानंतर हा एकप्रकारे पूर्ण फ्री गेम झाला होता. नोव्हेंबरपासून गेममधील सर्व कंटेंट फ्री झालं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 2, 2021 2:44 pm