News Flash

PUBG Mobile India च्या वेबसाइटवर आली गेमची डाउनलोड लिंक, पण…

भारतीय मार्केटसाठी पबजी मोबाइल स्पेशल व्हर्जनमध्ये...

PUBG Mobile गेमची इंडियन मार्केटमध्ये लवकरच पुन्हा एंट्री होणार आहे. यावेळी PUBG Mobile India नावाने हा गेम भारतीय युजर्ससाठी उपलब्ध होईल. चीनसोबत सीमेवर झालेल्या वादानंतर केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये PUBG Mobile गेमला देशभरात बॅन केले होते.

PUBG Mobile India हा गेम वर्षाअखेरपर्यंत लाँच केला जाण्याची शक्यता आहे. कारण PUBG Mobile च्या वेबसाइटवर डाउनलोड लिंक (PUBG Mobile APK Download Link) आणि एक पेज काही दिवसांपूर्वी दिसलं होतं असं काही युजर्सनी सांगितलंय. पण थोड्याच वेळात ही लिंक हटवण्यात आली. काही खेळाडूंना अधिकृत वेबसाइटवर गेमची APK डाउनलोड लिंक देखील दिसत होती, पण ती लिंक काम करत नव्हती. याशिवाय PUBG Mobile चा नवीन लोगोही यावेळी दिसून आला, असं काही युजर्सचं म्हणणं आहे. पण, आता हे सेक्शन अधिकृत वेबसाइटवरुन गायब झालं आहे. मात्र, यामुळे लवकरच गेमच्या लाँचिंगची तारीख समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ट्विटरवर काही युजर्सनी डाउनलोड लिंकबाबत ट्विटही केलेत.


भारतीय बाजारात पबजी मोबाइलचं स्पेशल व्हर्जन लाँच होणार आहे. पबजीने भारतीय गेमिंग इंडस्ट्रीमध्ये 100 मिलियन डॉलर गुंतवणूक करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. पबजी कॉर्पोरेशनची पॅरेंट कंपनी Krafton Inc भारतात 100 मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक भारतात गेम्स, ई स्पोर्ट्स, एंटरटेन्मेंट आणि आयटी इंडस्ट्रीसाठी असेल. पबजीने भारतीय बाजारात पुनरागमन केलं असून चिनी कंपनी टेन्सेंट गेम्ससोबतचा करार तोडला आहे. मात्र अद्याप पबजी कॉर्पोरेशनने लाँचिंगच्या तारखेची घोषणा केलेली नाही. पबजी मोबाइल इंडियाला खास भारताच्या दृष्टीकोनातून बनवण्यात आलं असून लवकरच लाँच केला जाईल असं कंपनीने जाहीर केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 3:14 pm

Web Title: pubg mobile apk download link spotted on official website pubg mobile india launch date sas 89
Next Stories
1 WhatsApp वर आला Disappearing Messages पर्याय; जाणून घ्या कसं सुरु करावं हे फिचर
2 डॉक्टरांची भन्नाट शक्कल! रुग्णाला ‘बिग बॉस’ दाखवून यशस्वीपणे केली ‘ओपन ब्रेन सर्जरी’
3 लवकरच गुगल सांगणार कोण करतंय कॉल, TrueCaller सारख्या फिचरवर सुरू आहे काम
Just Now!
X