25 February 2021

News Flash

PUBG Mobile Lite ला झालं एक वर्ष, नवीन बंदुकांसह मॅपही झाला अपडेट

PUBG Mobile Lite या लोकप्रिय ऑनलाइन बॅटल गेमसाठी नवीन अपडेट...

PUBG Mobile Lite या लोकप्रिय ऑनलाइन बॅटल गेमसाठी 0.18.0 हे नवीन अपडेट रोलआउट झालं आहे. पब्जी मोबाइलला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कंपनीने या गेमसाठी नवीन अपडेट जारी केलंय. या अपडेटमुळे गेममध्ये अनेक नवीन फीचर्स आणि काही बदल झालेत.

PUBG Mobile Lite हा गेम म्हणजे आधीपासून असलेल्या स्टँडर्ड पब्जी मोबाइल गेमसाठी लाइट व्हर्जन आहे. कमी फीचर्स असलेल्या फोनसाठी हा गेम डिझाइन करण्यात आला असून गेल्या वर्षीच कंपनीने तो लाँच केलाय. गेमच्या Varenga मॅपमध्ये नॉर्थवेस्ट साइडला नवीन रुप देण्यात आलं असून अनेक नवीन बाबींचा समावेश करण्यात आला आहे. पब्जी मोबाइल लाइट अपडेटमध्ये नवीन शस्त्रास्त्र, एक नवीन एरीना मॅप, सिस्टिम अपडेट्स, डिस्प्लेमध्ये सुधारणा यांसारखे अनेक नवीन अपडेट्स आहेत.

PUBG Mobile Lite 0.18.0 अपडेटमध्ये P90 सब-मशिनगन आणि MP5K सब-मशीनगन या दोन नवीन बंदूक आल्या आहेत. P90 गन केवळ एरीना गेम मोडसाठी आहे, तर MP5K क्लासिक मोडमध्ये वापरता येते. याशिवाय एरीना मोडमध्ये इंटिग्रेटेड वॉल्ट फंक्शन, स्लाइडिंग फंक्शन आणि ग्रेनेड इंडिकेटर मिळेल. तर, पिस्तूलसाठी असलेल्या अटॅचमेंट आता सब-मशिनगनमध्येही वापरता येतील. याशिवाय Varenga मॅपमध्ये एका लोकेशनवरुन दुसऱ्या लोकेशनला जाण्यासाठी नवीन ‘स्लो मूव्हिंग केबल कार’देखील देण्यात आली आहे. व्हर्जन 0.18.0 गुगलच्या प्ले-स्टोअरवर मोफत डाउनलोडिंगसाठी उपलब्ध झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 2:41 pm

Web Title: pubg mobile lite celebrates one year anniversary gets 0 18 0 update with new map areas guns and much more sas 89
Next Stories
1 NPCI ने लाँच केलं UPI AutoPay फीचर, दर महिन्याला आपोआप होणार पेमेंट
2 Google चा मोठा निर्णय! ‘या’ स्मार्टफोन्सना नाही मिळणार Android 11 चा सपोर्ट
3 येतोय नेटफ्लिक्सचा स्वस्त Mobile+ प्लॅन, वाचा किती आहे किंमत ?
Just Now!
X