PUBG Mobile हा गेम खेळणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. कंपनीने या बॅटल गेमसाठी लेटेस्ट अपडेट 0.18.0 रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. नव्या अपडेटमध्ये कंपनीने आधीचे अनेक बग्स फिक्स केले असून मॅड मीरामर, अधिक शस्त्रास्त्र आणि अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. आधीपेक्षा नव्या अपडेटमध्ये बरीच सुधारणा झाली आहे.

अँड्रॉइड युजर नवीन अपडेट गुगल प्ले स्टोअर आणि आयफोन युजर अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमधून डाउनलोड करु शकतात. या अपडेटची खासियत म्हणजे यातील Mad Miramar अपडेट. या मिरामर मॅपमध्ये अनेक नवीन एरिया आहेत. मॅपच्या उत्तरेकडे वाळवंटाचा नवा परिसर आहे. तर, ‘Urban Ruins’ आता प्लेयर्सना उत्तर-पश्चिम किनाऱ्यावर मिळेल.  याशिवाय मॅड मिरामरमध्ये प्लेयर्सना नवीम रेसट्रॅक देखील मिळेल. गेमची मजा वाढवण्यासाठी यामध्ये Golden Mirado नावाची एक नवीन गाडीही देण्यात आली आहे. मीरामर मॅपमध्ये तुम्हाला नवीन वेंडिंग मशिन, सँडस्टॉर्म इफेक्ट, नवीन अचीवमेंट आणि रिवॉर्ड्स मिळतील. 50 गोळ्यांची क्षमता आणि 9mm राउंड फायरिंगसह PUBG Mobile च्या 0.18.0 अपडेटमध्ये नवीन P90 ‘वेपन’ही दिले असून ते अ‍ॅरेना मोडमध्ये अ‍ॅडदेखील करण्यात आले आहे.

जंगल अ‍ॅडव्हेंचर मोड :-
नव्या अपडेटमध्ये ‘Cheer Park’ हे नवीन फीचर 20 प्लेयर्सना इंटरॅक्ट करणयासाठी अ‍ॅड करण्यात आलं आहे. तर, क्लासिक मोडमध्ये नवीन Canted Sight अटॅचमेंट असून यात बहुतांश असॉल्ट रायफल, छोटी मशिन गन्स, स्नायपर रायफल्स, लाइट मशिन गन्स आणि काही शॉटगन्स आहेत. याशिवाय, नव्या अपडेटमध्ये जंगल अ‍ॅडव्हेंचर मोडचा समावेश करण्यात आला आहे. Sanhok मॅच खेळताना जंगल अॅडव्हेंचर मोडमध्ये जाण्याचा रॅंडम चान्स मिळतो. रिजल्ट स्क्रीनमध्येही सुधारणा झाली असून आता डिटेलमध्ये हे सेक्शन दिसते. ज्या वेपन्सचा गेममध्ये वापर केला त्यांचे सर्व डिटेल्स प्लेयर्स रिझल्ट सेक्शनमध्ये बघू शकतात. याशिवाय दुसऱ्या प्लेयर्सच्या स्कोरसोबत तुलनाही करता येईल. 13 मे रोजी या गेमचा ‘रॉयल पास सीजन 13’ देखील येणार आहे.