27 February 2021

News Flash

करोना व्हायरसचा PUBG वरही परिणाम, गेम लव्हर्सना बसणार ‘हा’ मोठा झटका

करोना व्हायरसमुळे PUBG लव्हर्सना बसणार मोठा झटका...

करोना व्हायरसचं जगभरात थैमान सुरू असून आता या व्हायरसमुळे PUBG खेळणाऱ्यांचंही टेंशन वाढलंय. Tencent and PUBG Corporation ने करोना व्हायरसमुळे आपली PUBG MOBILE Pro and World league ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे PUBG  चाहत्यांची मात्र निराशा झाली आहे. यापूर्वी कंपनीने या स्पर्धेसाठीचे ग्राउंड इव्हेंट रद्द करण्याची घोषणा केली होती, तसेच केवळ ऑनलाइन इव्हेंटद्वारेच स्पर्धा होईल असे स्पष्ट केले होते. पण, आता कंपनीने ट्विटरद्वारे ही स्पर्धा पुढे ढकलत असल्याची माहिती दिली आहे. मात्र, पुन्हा कधी स्पर्धा घेतली जाईल याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही, त्यामुळे ही स्पर्धा रद्द होण्याचीही शक्यता आहे. PUBG खेळणाऱ्यांमध्ये या स्पर्धेबाबत आणि यातील विजेत्यांबाबत मोठी उत्सुकता असते, पण यावेळी करोना व्हायरसमुळे PUBG लव्हर्सना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

ही स्पर्धा पुढे ढकलताना खबरदारी आणि सुरक्षेला पहिलं प्राधान्य असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 11:38 am

Web Title: pubg mobile world league and pro league americas postponed due to coronavirus concerns coronavirus hits pubg mobile pro and world leagues sas 89
Next Stories
1 Coronavirus: लॉक डाऊनमुळे शहरात दिसू लागले डॉल्फिन ; पाणी आणि हवा प्रदूषणही झालं कमी
2 OFFER! 20 हजारांची Fully Automatic वॉशिंग मशिन फक्त 10,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी
3 Coronavirus: ‘मला करोना झालाय’…ऑफिसमध्ये फोन करुन खोटं बोलला; तीन महिन्यासाठी गेला तुरुंगात
Just Now!
X