News Flash

‘पबजी’मध्ये झोम्बींची एन्ट्री, उद्यापासून ‘झोम्बी मोड’!    

नव्या अपडेटेड व्हर्जनमध्ये खेळाडूंना पबजी मोबाइल व रेसिडेन्ट एव्हिल-2 एकत्र असणार

पबजी मोबाइल गेम खेळणाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे, कारण उद्यापासून ‘झोम्बी मोड’ हे नवं अपडेट गेम खेळणाऱ्यांसाठी कंपनीकडून जारी केलं जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून झोम्बी मोड येणार असल्याची चर्चा खेळाडूंमध्ये रंगली होती.

या नव्या अपडेटेड व्हर्जनमध्ये पबजी मोबाइल व रेसिडेन्ट एव्हिल-2 एकत्र असणार आहेत. खेळाडूंना झोम्बीज गट व झोम्बीजचा बॅास टॅायरेन्ट यांच्यासोबत लढावे लागणार आहे. पबजी मोबाइलचा हा 0.11.0 व्हर्जन आहे. झोम्बी मोडव्यतिरिक्त या व्हर्जनमध्ये खेळाडूंना काही नवीन व दमदार फीर्चस दिले जाण्याची अपेक्षा आहे. नव्या अपडेटसाठी या गेमचं सर्व्हर आज काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, परिणामी हा गेम काही तासांसाठी खेळता येणार नाही.

PUBG Mobile 0.11.0 अपडेटनंतर खेळाडूंसाठी चिकन डिनर मिळवणं अर्थात विजयी होणं खडतर बनण्याची शक्यता आहे. कारण या अपडेटनंतर झोम्बीज गट आणि त्यांचा बॉस टॅायरेन्ट याचा खात्मा करायचा आहे. याशिवाय इतर खेळाडूंच्या टीमसोबतही लढावं लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 3:34 pm

Web Title: pubg mobile zombie mode arriving
Next Stories
1 मारुतीच्या ‘प्रीमियम’ कार्सवर 1 लाखापर्यंत घसघशीत सूट
2 जीवन विमा खरेदी करताय? या गोष्टी लक्षात ठेवा
3 ‘आयुष्मान भारत’मध्ये खासगी सहभाग वाढवणार
Just Now!
X